Maharashtra Politics News: लोकसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी बेकायदेशीर क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बिटकॉइन (Bitcoin Scam) व्यवहारात गुंतल्याचा भाजपचा आरोप फेटाळून लावला. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये फिरत असलेल्या ध्वनीमुद्रीत फितीवरुन वाद निर्माणझाला आहे. त्याबातब बोलताना "कथीत आवाज माझा नाही. या सर्व व्हॉईस नोट्स आणि कथित ऑडिओ क्लिप बनावट आहे," असे सुळे यांनी पत्रकारांना सांगितले. मतदानानंतर त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या. दरम्यान, त्याचे वडील आणि राजकीय नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनीही सुळे यांच्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, सदर व्हॉईस नोट्समधील आवाज खरोखरच राष्ट्रवादीच्या (एससीपी) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रदेश काँग्रेस नाना पटोले यांचा असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप वाजवली. ज्यामध्ये निवडणूक मोहिमेला बेकायदेशीर क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन व्यवहारांद्वारे निधी पुरवण्यासाठी सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी माजी पोलीस आयुक्त आणि क्रिप्टोकरन्सी डीलरसोबत कट रचल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला होता. त्यानंतर आपल्यावरील सर्व आरोपांचे सुळे यांनी खंडण केले. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2024: बिटकॉइन घोटाळ्याचा पैसा निवडणुकीत वापरल्याचा माजी आयपीएस अधिकारी Ravindranath Patil यांचा आरोप; Supriya Sule यांची निवडणूक आयोगाकडे धाव, फौजदारी तक्रार दाखल)
आरोपात कोणतेही तथ्य नाही- शरद पवार
बिटकॉईन्स भाजप निराधार आरोप करत असल्याचा आरोप करत असल्याचे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांचा बचाव केला. "आरोप करणारी व्यक्ती स्वत:च अनेक महिने तुरुंगात होती. केवळ भाजपच अशा लोकांना हाताशी धरुन खोटे दावे करत असतो. हे आरोप मूर्खपणाचे आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही", असे पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी बारामती येथे मतदान केल्यावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (हेही वाचा, Pratibha Pawar: शरद पवार यांच्या सभेत प्रतिभा पवार यांनी झळकावले बॅनर; बारामती मतदारसंघासह राज्यभर चर्चा)
अजित पवार यांचा वेगळाच नूर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीला पाठिंबा देत म्हटले की, सत्य उघड करण्यासाठी आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. मी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांना चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यांचा आवाजही ओळखतो, क्लिपमधील आवाज दोघांचाच असल्यासारखे वाटते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी फेटाळले आरोप
सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहे. मी स्वत: अनेक वेळा बिटकॉईन्स विरोधात भूमिका घेतली आहे. तरीसुद्धा जर भाजपच्या लोकांना वाटत असेल की, या प्रकरणाची चौकशी व्हावी तर मी कोणत्याही चौकशीस तयार आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी खोटे प्रकरण पुढे आणून भाजप दिशाभूल करु पाहता आहे. पण, मी त्यांना सांगू इच्छिते त्यांनी वेळ द्यावा. मी कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक मंचावर या विषयावर चर्चेसाठी तयार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांचे भाजपला आव्हान
I deny all the allegations levelled against me by Sudhanshu Trivedi. All this is conjecture and innuendo, and I am ready for a debate with any representative of the bjp at a time and date of their choice, in a public forum.
— Supriya Sule (@supriya_sule) November 19, 2024
सुप्रिया सुळे यांनी पुढे असेही म्हटले आहे की, सुधांशू त्रिवेदी यांनी असे निराधार आरोप केले आहेत ते निराधार असले तरी, आश्चर्यकारक नाहीत. कारण त्यांना निवडणुकीच्या आदल्या रात्री खोटी माहिती पसरवायचीआहे. माझे वकील सुधांशू त्रिवेदी यांच्यावर जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटे आरोप केल्याबद्दल फौजदारी आणि दिवाणी मानहानीची नोटीस जारी करणार आहेत.
भाजप आरोपांवर ठाम
बिटकॉइन घोटाळाप्रकरणी भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे उत्तर मागितले आहे. ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत का आणि सुळे आणि पटोले क्रिप्टोकरन्सी विक्रेत्यांच्या संपर्कात आहेत का यासह पाच प्रश्न त्यांनी सादर केले. विधानसभा निवडणुकीसाठी निधी उभारण्यासाठी 2018 मध्ये हा घोटाळा घडवून आणण्यात आल्याचा दावा त्रिवेदी यांनी केला आणि व्यवहारांशी कथितपणे संबंधित असलेल्या "मोठ्या नावांच्या" सहभागाबद्दल स्पष्टता आणण्याचे आवाहन केले.