Russia Ukraine Crisis: युक्रेनहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच क्वारंटाईन केले जाणार, किशोरी पेडणेकर यांची माहिती
(Photo Credit - ANI)

मुंबई: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू (Russia Ukraine Crisis) झाल्याने राज्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आणले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतली नाही त्यांची मोफत कोरोना चाचणी करून घरी क्वारेंटाईन केले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली. दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढून आज रात्री 9 वाजता मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आणण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (Foreign Minister Dr. S. Jaishankar) युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या 219 भारतीयांसह पहिले विमान रोमानियाहून मुंबईला रवाना झाल्याची माहिती जयशंकर यांनी दिली आहे. त्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने पूर्ण तयारी केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी विमानतळ प्रशासनाने स्पेशल कॉरिडॉर बंद केला आहे. हे भारतीय विद्यार्थी एअर इंडियाच्या विमान-A11944 ने मुंबईला पोहोचतील.

युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना घरीच क्वारंटाईन केले जाणार

मुंबईत आलेल्या प्रवाशांपैकी ज्यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत त्यांच्यावर बंधन नाही. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांची मोफत कोरोना चाचणी करून घरी क्वारेंटाईन केले जाईल. त्यांना मानसिक आधार देण्याचे, जेवण देण्याचे काम महापालिका करणार आहे. त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवले जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. (हे ही वाचा Ukraine Russia Crisis: युक्रेनमधून 219 भारतीयांसह पहिले विमान रोमानियाहून रवाना, रात्री 9 वाजेपर्यंत पोहोचणार मुंबईत)

Tweet

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने पूर्ण तयारी केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी विमानतळ प्रशासनाने स्पेशल कॉरिडॉर बंद केला आहे. हे भारतीय विद्यार्थी एअर इंडियाच्या विमान-A11944 ने मुंबईला पोहोचतील. आगमन झाल्यावर कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र, आरटी-पीसीआर निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करणे आवश्यक असेल. जर कोणताही प्रवासी आगमनाच्या वेळी कोणतीही कागदपत्रे दाखवू शकला नाही, तर त्यांना विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल, तो खर्च विमानतळाद्वारे केला जाईल.

चाचणी निगेटिव्ह झाल्यानंतर हे प्रवासी विमानतळावरून बाहेर पडू शकतील. कोणत्याही प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, सरकारने घालून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार त्यांचे वैद्यकीयदृष्ट्या व्यवस्थापन केले जाईल, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.