सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा
Rahul Gandhi | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्राच्या (Maharashtra)मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान होणार आहेत. यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही उद्धव ठाकरे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आमंत्रण देण्यात आले होते. परंतु, काही कारणानिमित्त त्यांना मुंबई येथील शिवतिर्थावर येता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे राजकारणातील चर्चांना उधाण आले आहे. आज 6.40 मिं उद्धव ठाकरे शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहेत.

सोनिया गांधी यांचे ट्विट-

राहुल गांधी यांचे ट्विटी-