शिवसेना आक्रमक; युवासैनिकांनी थिएटरमध्ये घुसून कन्नड सिनेमाचा शो पाडला बंद
ShivSena (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कर्नाटक (Karnataka) येथे पुतळा जाळल्यानंतर शिवसेना (ShivSena) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोल्हापूर (Kolhapur) येथील युवासैनिकांनी थिएटरमध्ये घुसून कन्नड सिनेमाचा शो बंद केला आहे. याशिवाय युवासैनिकांनी संबंधित सिनेमागृहावरील कन्नड पोस्टरदेखील उतरवले आहेत. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील (BhimaShankar Patil) यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जावून गोळ्या घाला, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वाद पेटायला सुरुवात झाली. सध्या दोन्ही राज्यातील वातावरण तापले असून खबरदारी म्हणून कोल्हापूर ते कर्नाटक ये- जा करणारी बससेवा बंद करण्यात आली आहे.

भीमाशंकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर कन्नड संघटना आक्रमक झाली. दरम्यान, कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडले. तसेच शिवसैनिकांनी शनिवारी अंदोलन केल्याचे समजताच कन्नड संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यानंतर युवासैनिकांनी कोल्हापूरच्या अप्सरा थिएटरमध्ये सुरू असलेला ‘अवणे श्रीमनारायन’ हा सिनेमा थिएटरमध्ये घुसून बंद पाडला. याशिवाय सिनेमागृहावरील कन्नड पोस्टरही फाडले. हे देखीव वाचा- मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला; महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे फुटली?

बेळगावमध्ये भाषिक मुद्यावरुन वातावरण तापल्यामुळे खबरदारी म्हणून कोल्हापूरहून कर्नाटकच्या दिशेने ये- जा करणारी बस सेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर ते कर्नाटक आणि कर्नाटक ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. सीमा प्रश्नाच्या वादाचा फटका बस सेवेला बसू नये, यासाठी प्रशासनाकडून बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे