मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला; महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे फुटली?
Sharad Pawar,Sonia Gandhi,Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra cabinet Expansion) मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण देशाकडे लक्ष लागले आहे. सध्या यातील संभाव्य नेत्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या यादी संदर्भात सरकारकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होऊन अनेक दिवस उलटले तरीदेखील राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. यातच मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य नेत्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या यादीत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना स्थान मिळणार आहेत. याचत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात दिल्ली गेले असल्यामुळे या चर्चाना अधिक बळ मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे, या यादीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे समोर आले आहे. याशिवाय शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी 13 तर, काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा उद्या होणार विस्तार, 36 मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री

अजित पवार

दिलीप वळसे पाटील

अनिल देशमुख

जितेंद्र आव्हाड

नवाब मलिक

हसन मुश्रीफ

बाळासाहेब पाटील

धनंजय मुंडे

राजेश टोपे

डॉ. राजेंद्र शिंगणे

दत्ता भरणे

किरण लहामटे

काँग्रेसचे संभाव्य मंत्री-

उत्तर महाराष्ट्र

के. सी. पाडवी

मराठवाडा-

अशोक चव्हाण

अमित देशमुख

पश्चिम महाराष्ट्र-

विश्वजित कदम

प्रणिती शिंदे

विदर्भ-

विजय वड्डेटीवार

यशोमती ठाकूर

मुंबई-

अमिन पटेल

शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार

मुंबई-

रवींद्र वायकर

सुनील प्रभू

ऍड अनिल परब

ठाणे-

प्रताप सरनाईक

डॉ.बालाजी किणीकर

कोकण-

उदय सामंत

दीपक केसरकर

भास्कर जाधव

विदर्भ-

संजय राठोड

आशिष जयस्वाल

बच्चू कडू ( अपक्ष शिवसेनेला पाठिंबा दिलेले)

उत्तर महाराष्ट्र-

गुलाबराव पाटील

दादा भुसे

सुहास कांदे

मराठवाडा-

अब्दुल सत्तार

संजय शिरसाठ

डॉ.संदीपन भुमरे

राहुल पाटील

पश्चिम महाराष्ट्र-

तानाजी सावंत

शंभूराजे देसाई

प्रकाश अबिटकर

महिला आमदार-

डॉ. नीलम गोऱ्हे

मनीषा कायंदे

वरील संभाव्य नेत्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या यादी संदर्भात सरकारकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.