Coronavirus: कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तसेच राज्यात सध्या विविध उपाययोजना आणि संशोधन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून वस्तूवरील निर्जंतुकीकरणासाठी (Disinfection) राज्यात अतिनील किरणांची टॉर्च निर्मिती (Ultraviolet Flashlight) करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सॅनिटायझर टनेल निर्मिती करणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील प्रा. आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सोनकवडे, पूनम सोनकवडे या भावंडांकडून या टॉर्चची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी असे नाविन्यपूर्ण संशोधन करावे, असं आवाहनही उदय सामंत यांनी केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: मुंबईतील एका नामांकित वाहिनीच्या सक्रीय पत्रकाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण)
#coronavirus चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि संशोधन सुरू. त्याचाच एक भाग म्हणून वस्तूवरील निर्जंतुकीकरणासाठी राज्यात अतिनील किरणांची टॉर्च निर्मिती- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @meudaysamant यांची माहिती pic.twitter.com/TeBHBYP7Yr
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 13, 2020
भारतामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी अतिनील किरणांचा वापर केला जातो. एखादी वस्तू, भाजीपाला, फळांवर अतिनील किरणांचा मारा झाल्यास ती एकसंधपणे सर्वत्र विखुरली जाऊन वस्तूचे निर्जंतुकीकरण होते. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही टॉर्च विद्युत ऊर्जेवर चालणारी असून याचा वापर करणेही फारचं सोपे आहे, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. दैनंदिन जीवन जगताना आपल्याकडून विविध वस्तूंना स्पर्श होतो. त्यातून इतरांना विषाणूंचे संक्रमण होण्याची शक्यता असते. कोणताही विषाणू नष्ट करण्यासाठी अतिनील किरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे या टॉर्चच्या माध्यमातून 16 ते 33 वॅट एवढ्या क्षमतेच्या अतिनील किरणांचा पुरवठा होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि वस्तूवरील निर्जंतुकीकरणासाठी ही अतिनील किरणांची टॉर्च अत्यंत उपयोगी असल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे.