शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीस सोनिया गांधी यांचा कौल, महाराष्ट्रात भाजपेत्तर पक्षांचे सरकार स्थापन्याचा मार्ग मोकळा – सूत्र
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sonia gandhi | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena-NCP-Congress Alliance) अशी नव्याने आकारास येत असलेल्या आघाडीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडून हिरावा कंदील मिळाल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे जेष्ठ आणि केंद्रीय नेत्यांची एक बैठक दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात पार पडली. या बैठकीत नव्याने आकारास येणारी आघाडी आणि या आघाडीतील किमान समान कार्यक्रम (Common minimum programme) या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचेच समजते. मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते या बैठकीस उपस्थित होते. सोनिया यांनी कौल देताच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीद्वारे राज्यात सत्तास्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या आघाडीस राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. मात्र, काँग्रेस नेतृत्व खास करुन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा विरोध असल्याने सरकारस्थापनेच्या चर्चा लांबणीवर पडत असल्याची चर्चा होती. त्यामुळे हे संभवीत असलेले हे सरकार स्थापन होण्याच्या चर्चा लांबणीवर पडत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम आणि राज्यातील या नव्या आघडीवर चर्चा झाली आणि सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला, असे समजते.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या बैठकी नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची एक बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडल्याने ही चर्चा सरकारस्थापनेच्या अंतिम निर्णयाप्रत पोहोचली असावी, असे मानले जात आहे. (हेही वाचा, आमदार फोडायचा प्रयत्न केला तर, डोकी फोडू, हातपाय तोडू; शिवसेना आमदाराचा इशारा)

दरम्यान, राज्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची नैतिक जबाबदरी शिवसेना-भाजप यांच्यावर येते. शिवसेना-भाजप यांनी निवडणूकपूर्व युती केली आहे. त्यामुळे ही जाबबदारी अधिक वाढते. मात्र, मुख्यमंत्रीपद आणि समसमान सत्तावाटप या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये वितूष्ट आले आहे. या पार्श्वभूमिवर विधानसभेतील सर्वाधीक जागा मिळवणारा पक्ष म्हणून भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणे अपक्षीत होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे राज्यात भाजपेत्तर पक्ष आघाडी करुन सत्तेवर येणार अशी चिन्हे आहेत. मात्र त्यांचेही घोडे किमान समान कार्यक्रमावर अडले आहे.