
Shikhar Bank Scam : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) आणि इतर आरोपींवर शिखर बँक घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. आता शिखर बँक घोटाळा(Shikhar Bank Scam) प्रकरणी सर्वांना सर्वांना क्लिन चीट देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यात, कर्ज वाटप व साखर कारखान्याच्या विक्री संबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. त्यामुळे अजित पवारांसह सुनेत्रा पवारांना दिलासा मिळाला आहे.ऐन लोकसभा निवडणुकीच्या गोंधळात अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मिळाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद पहायला मिळत आहे. (हेही वाचा : Ajit Pawar NCP: अजित पवार यांच्याबद्दलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी? पक्षात चलबिचल)
पोलिसांनी या प्रकरणी जानेवारी महिन्यात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप अजित पवार आणि इतर आरोपींवर करण्यात आले होते. क्लोजर रिपोर्ट सादर करतांना कर्ज वाटप व साखर कारखाने विक्री संबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे.
तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा होता. या पूर्वी या प्रकरणात मुंबई पोलिसांनी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या पूर्वी महावीकास आघाडी सरकारच्या काळात पहिला क्लोजर रीपोर्ट सादर झाला होता. तपासात पुरावे आढळले नसल्याने हा रीपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला होता.
क्लोजर रिपोर्टमध्ये काय म्हटले?
गुरु कमोडिटीकडून जरंडेश्वर साखर कारखान्यानं जंरडेश्वर सहकारी साखर कारखाना चालवयला घेतला होता. मात्र, या व्यवहारात त्या आर्थिक गुन्हे शाखेला कोणत्याही गैरप्रकार आढळला नाही. ईडीने या प्रकरणात ठपका ठेवला होता. गुरु कमोडिटी व जरंडेश्वर साखर कारखान्यांनी सगळ्या गोष्टी केवळ कागदावर दाखवल्या होत्या, असा उल्लेख ईडीने केलेल्या आरोप पत्रात करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेनं आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांनादेखील क्लीन चिट दिली आहे. 'रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोनं कन्नड साखर कारखाना खरेदी केला, तेव्हा बारामती ऍग्रोची आर्थिक स्थिती चांगली असल्याने पैशांची हेराफेरी करण्यात आली नाही,' असं आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, जानेवारी २०२४ मध्ये दाखल झालेला हा क्लोजर रिपोर्ट विशेष कोर्टानं स्वीकारलेला नाही.
काय आहे शिखर बँक घोटाळा?
शिखर बँक घोटाळा तब्बल २५ कोटी रुपयांचा आहे. शिखर बँकेने राज्यातील २३ सहकारी साखर कारखान्यांना १५ वर्षांपूर्वी कर्ज दिले होते. मात्र, हे कारखाने तोट्यात जाऊन बुडाले. दरम्यान, हे कारखाने काही नेत्यांनी खरेदी केले. यानंतर पुन्हा या कारखान्यांना शिखर बँकेने कर्ज दिले गेले. यावेळी अजित पवार या बँकेच्या संचालक मंडळात होते. अजित पवार यांच्यासोबतच अमरसिंह पंडित, माणिकराव कोकाटे, शेखर निकम या नेत्यांचा या प्रकरणात समावेश होता.