Sanjay Gaikwad Viral Video: बुलढाण्याचे ( Buldhana) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी मतदारांना जाहीर शिवीगाळ केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त विधानसाठी ओळखले जातात. आता पुन्हा त्यांनी असेच वक्तव्य केले आहे. फक्त मटण, दारू आणि दोन हजारात विकले गेले असं म्हणताना त्यांनी शिवीही हासडली. बुलढाण्यातील जयपूरमध्ये जाऊन मतदारांसंदर्भात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे पाहायला मिळाले. मतदारांपेक्षा XX बऱ्या, मतदारांना फक्त दारू, मटण पाहिजे, मतदार विकले गेले आहेत, असं वक्तव्य करत आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. (हेही वाचा - Meghna Gajanan Kirtikar: गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना यांचे निधन)
पाहा पोस्ट -
Sanjay Gaikwad: निवडणुकीत निसटत्या फरकाने जिंकले, शिंदेंच्या आमदाराने मतदारांना नको ते सुनावले https://t.co/Ypb3AaOK7K#NDTVMarathi #sanjaygaikwad #shivsena
— NDTV Marathi (@NDTVMarathi) January 5, 2025
शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी गायकवाड यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभे केले होते. यावेळी झालेल्या कमी मतदानामुळे सत्कार कार्यक्रमात मतदारांनाच खरी खोटी सुनावली. यावेळी बोलताना त्यांची नेहमी प्रमाणे जीभ घसरली.