ज्येष्ठ शिवसेना (Shiv Sena) नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्या पत्नी मेघना किर्तीकर (Meghna Kirtikar) यांचे आज सकाळी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पहाटे 3:30 च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. काही काळापासून त्या प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त होत्या. त्यांच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव आज दुपारी 4 ते संध्याकाळी 6 दरम्यान स्नेहदीप, पहाडी, आरे मार्ग, गोरेगाव (पूर्व) येथे सार्वजनिक दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.
गजानन कीर्तिकर यांच्याबद्दल
गजानन कीर्तिकर हे मुंबई उत्तर-पश्चिमचे माजी खासदार आहेत. पाठिमागील काही काळापासून ते लोकसभेवर या मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून प्रतिनिधित्तव करत होते. शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यांनी ठाकरे कुटुंबाची साथ सोडली. सध्या ते शिवसेनातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे. त्यांची राजकीय कारकीर्द अनेक दशकांपर्यंत विस्तारलेली आहे, ज्यात 1990 ते 2009 पर्यंत मालाड मतदारसंघातील विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून त्यांचा कार्यकाळ समाविष्ट आहे. किर्तीकर यांनी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात गृह राज्यमंत्रीपदही भूषवले होते. (हेही वाचा, Satish Pradhan Dies: ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन)
मेघना कीर्तिकर यांचे विषयी
मधल्या काळात गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे कुटुबाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना पक्षासोबत (शिंदे गट) जाणे पसंत केले. दरम्यान, त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हा मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहीला. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीतही अमोल यांनी शिवसेना (UBT) पक्षाकडून निवडणूक लढवली. या वेळी मेघना कीर्तिकर या आपला मुलगा अमोल यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच, गजानन किर्तीकर यांनी ठाकरे यांची शिवसेना सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य नसल्याच्या आशयाचे मत व्यक्त केले होते. विशेष म्हणजे पती गजानन कीर्तिकर यांच्यासोबत एकाच वाहनातून मतदानासाठी आल्यानंततर त्यांनी हे विधान केले होते. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. (हेही वाचा, Gajanan Kirtikar: एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास पण पक्षशिस्तीचे काय? शिवसेना नेत्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई?)
दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी देखील पत्नी मेघना कीर्तिकर यांच्या वक्यव्यास दुजोरा दिला होता. आपण ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय पत्नी आणि मुलांना पटला नव्हता. परंतू, आपण केवळ ईडी आणि दबाव यांच्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलो नाही. आपण ठाकरे यांची साथ सोडण्यास इतरही अनेक कारणे होती, असे ते म्हणाले होते.
अनेक राजकीय नेते आणि हितचिंतकांनी कीर्तिकर कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. मेघना कीर्तिकर आपल्या पतीच्या राजकीय प्रवासासाठीच्या आणि समर्थनासाठी ओळखल्या जात होत्या. कीर्तिकर यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.