शिवसैनिक, ठाण्याचे पहिले महापौर आणि माजी राज्यसभा खासदार सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. ठाण्यात मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र आज (29 डिसेंबर) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या 30 डिसेंबर दिवशी त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत या दु:खद बातमीला दुजोरा देत आदरांजली अर्पण केली आहे.
सतीश प्रधान यांचे निधन
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)