Photo Credit- X

Perth Scorchers vs Melbourne Renegades 26th Match Big Bash League 2024-25 Live Streaming: बिग बॅश लीग 2024-25 (Big Bash League) चा 26 वा सामना आज 7 जानेवारी रोजी पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स (Perth Scorchers vs Melbourne Renegades) यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना पर्थ स्टेडियमवर होणार आहे. पर्थ स्कॉचर्सने या स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. गुणतालिकेत पर्थ स्कॉचर्स संघ 6 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मेलबर्न रेनेगेड्स संघाने स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील 26 वा सामना कधी खेळला जाईल?

बिग बॅश लीग 2024-25 मधील पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील 26 वा सामना सोमवारी 7 जानेवारी रोजी पर्थमधील पर्थ स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेक अर्धा तास आधी होईल. (Virat Kohli Test Stats In Last 5 Years: विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी, पाहा गेल्या 5 वर्षांची आकडेवारी)

पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील 26 वा सामना कोठे पहाल?

पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील बिग बॅश लीग 2024-25 मधील 26 वा सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, तुम्ही डिस्ने + हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग द्वारे पाहू शकता.

दोन्ही संघांतील खेळाडू

पर्थ स्कॉचर्स संघ : फिन ऍलन (विकेटकीपर), ऍश्टन टर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, ऍरॉन हार्डी, कूपर कॉनोली, निक हॉब्सन, ऍश्टन अगर, मॅथ्यू स्प्राऊस, मॅथ्यू केली, अँड्र्यू टाय, जेसन बेहरेनडॉर्फ, लान्स मॉरिस, सॅम फॅनिंग, झाई रिचर्डसन

मेलबर्न रेनेगेड्स संघ: टिम सेफर्ट (विकेटकीपर), विल सदरलँड (कर्णधार), जोश ब्राउन, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, जेकब बेथेल, जोनाथन वेल्स, लॉरी इव्हान्स, झेवियर क्रोन, थॉमस स्टीवर्ट रॉजर्स, गुरिंदर संधू, ॲडम हारिस झम्पा, मार्कस हारस, मार्कस ओ'नील, केन रिचर्डसन