Pushpa 2 Box Office Collection: 'पुष्पा 2' (Pushpa 2) रिलीज झाल्यापासून सातत्याने नवे विक्रम करत आहे. आता या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा दावा केला आहे. रविवारी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे, निर्मात्यांनी दावा केला की, हा चित्रपट आता हिंदी भाषेत 800 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 'पुष्पा'च्या अधिकृत X खात्यावरून 5 जानेवारीला एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये चित्रपटाच्या कलेक्शनबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, 'ब्रँड पुष्पा चित्रपटाने हिंदीमध्ये 800 कोटी क्लबचा टप्पा पार केला आहे. पुष्पा 2 ने हिंदीमध्ये केवळ 31 दिवसांत 806 कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.'
निर्माते आणि SACNILC च्या आकडेवारीमध्ये तफावत -
मात्र, SACNILC च्या आकडेवारीनुसार हा चित्रपट अजूनही 800 कोटींच्या क्लबपासून काही अंतरावर आहे. त्यानुसार 31 व्या दिवशी या चित्रपटाने हिंदी भाषेत 4 कोटी 40 लाख रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपटाची एकूण हिंदी कमाई आता 785.7 कोटींवर पोहोचली आहे. निर्माते आणि SACNILC च्या आकडेवारीमध्ये 20.3 कोटी रुपयांची तफावत असल्याचे दिसते. (हेही वाचा -Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' 800 कोटींच्या जवळ, चित्रपटाची दमदार कामगिरी सुरूच)
'पुष्पा 2' ठरला हिंदीत 800 कोटींची कमाई करणारा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट -
Brand #Pushpa Inaugurates 𝟖𝟎𝟎 𝐂𝐑𝐎𝐑𝐄 CLUB in Hindi ❤🔥#Pushpa2TheRule has a RECORD BREAKING COLLECTION in Hindi with 𝟖𝟎𝟔 𝐂𝐑𝐎𝐑𝐄𝐒 𝐍𝐄𝐓𝐓 in 31 days 💥💥
Book your tickets now!
🎟️ https://t.co/eJusnmNS6Y#Pushpa2#WildFirePushpa
Icon Star @alluarjun… pic.twitter.com/GopbAQyrkx
— Pushpa (@PushpaMovie) January 5, 2025
जगभरात 1831 कोटींची कमाई -
या चित्रपटाने जगभरात 1831 कोटींचा व्यवसाय केला आहे. आगामी काळात चित्रपटाची कमाई आणखी वाढू शकते. हा चित्रपट 2000 कोटींची कमाई करण्यात यशस्वी होईल, अशी आशा ट्रेड तज्ज्ञांना आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, 'पुष्पा 2' निर्मात्यांनी सुमारे 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला होता. (हेही वाचा - Pushpa 2 Box Office Collection: 'पुष्पा 2' बनला आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, दोन आठवड्यात केला 632 कोटींहून अधिकचा व्यवसाय)
पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्नाची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांचा खूपचं आवडली. या चित्रपटात फहाद फासिल देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला दररोज नवनवीन विक्रम रचण्यात यश मिळत आहे. 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा: द राइज'ने 350 कोटींचा व्यवसाय केला होता. आता त्याचा तिसरा भाग बनवण्याची तयारी निर्मात्यांनी सुरू केली आहे.