Loveyapa Trailer Release Date: जुनेद खान (Junaid Khan) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) यांनी गेल्या वर्षी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. केव्हा पासून दोघे सतत चर्चेत असताता. ते आता त्यांच्या आगामी 'लव्हयापा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट चर्चेत आहे. आता, चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिला ट्रेलर रिलीज (Loveyapa Trailer) करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहेत.(‘Good Bad Ugly’ Release Date: दिग्दर्शक रविचंद्रन यांचा 'गुड बॅड अग्ली' हा चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला)
जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या आगामी 'लवयापा' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टायटल ट्रॅकचे अनेक बॉलिवूड कलाकारांनी कौतुकही केले होते. त्याचबरोबर सोशल मीडियावर चाहत्यांनीही ट्रॅकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. पहिल्या गाण्याला मिळालेल्या कौतुकानंतर आता या चित्रपटाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे आमिर खान या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करणार आहे.
ट्रेलर लाँच कधी होणार
10 जानेवारी 2025 रोजी आमिर खान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात जुनैद खान, खुशी कपूर आणि इतर कलाकार आहेत. नुकतेच आमिर खानने या चित्रपटातील खुशी कपूरच्या अभिनयाचे कौतुक केले. आमिर म्हणाला की, 'जेव्हा मी चित्रपट पाहिला आणि खुशी पाहिली तेव्हा मला वाटले की मी श्रीदेवीला पाहत आहे. तिच्या कलेने मला तिच्या आईची आठवण करून दिली. मी श्रीदेवींचा खूप मोठा चाहता आहे आणि मला नेहमीच त्याच्यासोबत काम करायचे होते. त्या एक मोठ्या कलाकार होत्या. खुशीच्या अभिनयातही त्यांची चमक स्पष्ट दिसते.