Prakash Abitkar With Doctors (फोटो सौजन्य - फेसबुक)

Maharashtra Govt On Alert Over HMPV: देशात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (Human Metapneumovirus) च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी नागपुरात दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) अलर्ट मोडमध्ये आले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी एचएमपी व्हायरस (HMPV Virus) बाबत आरोग्य विभागाची (Health Department) तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नागपुरातही एचएमपी विषाणूचे 2 रुग्ण -

नागपुरातही एचएमपी विषाणूचे 2 रुग्ण आढळले आहेत. दोन मुलांचे रिपोर्ट एचएमपी पॉझिटिव्ह आले आहेत. 3 जानेवारी रोजी एका खासगी रुग्णालयात सात वर्षांचा मुलगा आणि 14 वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि ताप अशी लक्षण होती. (हेही वाचा -HMPV Patient in Nagpur: महाराष्ट्रात ह्युमन मेटाप्युमोव्हायरस प्रवेश; नागपूर येथे HMPV संक्रमित दोन रुग्णांची नोंद)

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस कोविडपेक्षा जुना -

दरम्यान, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ राहुल पंडित यांनी सांगितले की, एचएमपीव्ही ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसबद्दल घाबरण्याची गरज नाही. हा नवीन व्हायरस नाही. हा कोविड पेक्षा जुना व्हायरस आहे. डॉ. राहुल पंडित हे श्वसन रोगांशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य आहेत. तथापी, ते मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलच्या आयसीयू युनिटचेही प्रमुख आहेत. (हेही वाचा, What Is HMVP Virus? एचएमव्हीपी व्हायरस म्हणजे काय? तो Covid-19 विषाणूसारखाच धोकादायक? घ्या जाणून)

2001 मध्ये नेदरलँडमध्ये आढळला होता मेटापन्यूमो व्हायरस -

डॉ राहुल पंडित यांनी सांगितलं की, मेटापन्यूमो व्हायरसची प्रकरणे 2001 मध्ये नेदरलँडमध्ये आढळली होती. प्रत्येक विषाणूमध्ये उत्परिवर्तन असते, परंतु हा घटक नाही. हे सामान्य फ्लू न्यूमोनियासारखे आहे. यापेक्षा इतर विषाणूजन्य आजारांची प्रकरणे आपल्याकडे येतात. त्याची लक्षणे सर्दी-खोकल्यासारखी आहेत. परंतु मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. केवळ कर्करोग, उच्च मधुमेह आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी रुग्णांना थोडी अधिक काळजी घ्यावी लागते. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर, रुग्ण सात दिवसात पूर्णपणे बरा होतो. (हेही वाचा, JP Nadda On HMPV Cases: 'काळजी करण्याचे कारण नाही, भारत त्वरित प्रतिसाद देण्यास तयार आहे'; आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची माहिती)

डॉक्टरांचा सल्ला घ्या - डॉ राहुल पंडित

मेटापन्यूमो व्हायरस लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. जर सर्दी, खोकला किंवा ताप दोन-तीन दिवसांत कमी झाला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोविडमधील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. त्याचप्रमाणे सर्दी-खोकल्याच्या वेळीही रुमाल वापरा आणि हात स्वच्छ धुवा. ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, असं आवाहनही डॉ. पंडित यांनी केलं आहे.