JP Nadda On HMPV Cases: सध्या जगभरात चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही व्हायरसची चर्चा सुरू आहे. अशातचं आता केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा (Union Health Minister JP Nadda) यांनी देशातील नागरिकांना आवाहन केलं आहे. जेपी नड्डा यांनी सांगितलं आहे की, हा व्हायरस सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकते. व्हायरस हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या महिन्यांत अधिक पसरतो. चीन तसेच शेजारील देशांमधील परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. त्याचा अहवाल लवकरच आमच्याशी शेअर केला जाईल. दरम्यान, भारतात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणूजन्य रोगजनकांमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नाही. काळजी करण्याचे कारण नाही, भारत त्वरित प्रतिसाद देण्यास तयार आहे, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.
भारत त्वरित प्रतिसाद देण्यास तयार आहे; जेपी नड्डा यांची माहिती -
#WATCH | Union Health Minister JP Nadda says, "Health experts have clarified that #HMPV is not a new virus. It was first identified in 2001 and it has been circulating in the entire world since many years. HMPV spreads through air, by way of respiration. This can affect persons… pic.twitter.com/h1SSshe2iQ
— ANI (@ANI) January 6, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)