रत्नागिरी येथील आंबेनळी घाटात 800 फूट दरीत ट्रक कोसळला
Representational Image (Photo Credit: File Photo)

रत्नागिरी (Ratnagiri) येथील आंबेनळी घाटात 800 फूट दरीत ट्रक कोसळला आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ट्रेकर्सनी धाव घेतली.

आंबेनळीत ट्रक चालकाला त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटत असल्याचे कळले. त्यावेळी चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या क्लिनरले तेव्हाच ट्रक मधून बाहेर उडी घेतली. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत.(Maharashtra Monsoon 2019 Live Updates: तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा कोलमडली; पहिल्याच पावसात मध्य रेल्वे रखडली)

जखमी झालेल्या ट्रक चालकाला आणि क्लिनरला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच कोणतीही जिवतहानी झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.