संपूर्ण मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. काही बसेसचे मार्ग बदलन्यात आले असून, काही लोकल ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत चालू असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

मुंबई आज मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत तर एकाही ठिकाणी अजूनही पाणी साचलेले आहे. अशा परिस्थितीत ट्राफिकची समस्या ओळखून मुंबईमधील अनेक बस मार्ग बदलण्यात आले आहेत, पहा कोणत्या बस मार्गांत झाला आहे बदल

आज दिवसभर पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे.अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी अजूनही पावसाची रिमझिम सुरु आहे. या पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकलवरही झाला आहे.हार्बर रेल्वे मार्गावरील 7 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत
मध्ये रेल्वे मार्गावरील 14 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत
अप मार्गावरील ट्रेन 10-15 मिनिटे उशिरा धावत आहेत
ट्रान्स हर्बर मार्गावरील ट्रेन सुरळीत धावत आहेत

सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील विविध भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्यातून चालताना खबरदारी घ्या आणि काही गरज लागण्यास आमची मदत घ्या, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगरात आतापर्यंत अनुक्रमे 33mm आणि 95mm पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काही वेळ लागेल. आम्ही देखील सतर्क असून आज संध्याकाळपर्यंत सर्व काही सुरळीत होईल, अशी आशा मुंबई महानगरपालिकेने व्यक्त केली आहे.

अनेक ठिकाणी पाणी साचले. तर वाहतुकी कोंडी, लोकलसेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. उशिराने बरसणारा पाऊस सुखावणारा असला तरी पहिल्याच पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

गेल्या 5 तासांपासून मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, किंग सर्कल परिसरात पाणी साचण्यास सुरुवात.

आसनगाव-वाशिंद दरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाराकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक रखडली आहे.

नवी मुंबईतील सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिराने तर धीम्या मार्गावरील वाहतूक 20 मिनिटे उशिराने. पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरु असून हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूकही 15-20 मिनिटे उशिराने सुरु आहे.

Load More

नागरिकांची मान्सूनची प्रतिक्षा संपवत महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. मात्र ही सुरुवात म्हणावी तशी झाली नाही. पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात पावसाने जोर धरला असला तरी मुंबईत पाऊस अजूनही हवा तसा बरसला नाही. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने बळीराजासह सामान्य नागरिकही चिंतेत होते.

मात्र स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत महाराष्ट्रातील अलिबाग, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगरं, नागपूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि ठाणे या भागात थंडीच्या लाटेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर येथे पहा आज कोणत्या ठिकाणी किती पाऊस झाला आणि आजचा पावसाच्या अंदाजाचे लाईव्ह अपडेट्स...