Mumbai Grant Road Building Collapse: मुंबईत अनेक भागात आज शनिवारी 20 जुलै रोजी जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती ही निर्माण झाली आहे. अंधेरी तर सबवे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशातच मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात रुबिनिसा मंझील या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याचे (Grant Road Building Collapse)समोर आले आहे. इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला. त्या ढिगार्याखाली अनेक लोक अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तेथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. (हेही वाचा: Mumbai Rain Update:मुंबईत पावसाची धुवाधार बॅटींग; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Watch Video))
पोस्ट पहा
Maharashtra | Part of the balcony of a building named Rubina Manzil collapsed in the Grand Road area of Mumbai. Some people are feared to be injured in this accident. Fire brigade personnel reached the spot: BMC
— ANI (@ANI) July 20, 2024
Mumbai: Grant Road area, a part of the four-story Rubunisa Mansion building collapsed, resulting in one death and four injuries. The building, declared dangerous six months ago, had people trapped inside. Heavy rainfall and flooding have worsened the situation. Rescue operations… pic.twitter.com/jdjGl9S0mr— IANS (@ians_india) July 20, 2024
रुबिनिसा मंझिल ही चार मजली इमारत आहे. ही खूप जुनी इमारत असून ती जिर्ण झाली होती. सकाळी 11 वाजेच्या सुमारास या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीच्या स्लॅब, चौथ्या मजल्यावरील काही भाग कोसळला. सकाळची वेळ असल्याने परिसरात नागरिकांची ये-जा सुरु होती. अचानक काही समजन्याआधी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला. त्यावेळी काही जण अडकले. विशेष म्हणजे म्हाडाने या इमारतीला धोकादायक असल्याची कुठलीही नोटीस बजावली नव्हती