Photo Credit- X

Mumbai Rain Update: मुंबईसह उपनगरात पावसाची धुवाधार बॅटींग सुरू आहे. दादर, अंधेरी, हिंदमाता परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहेत. अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसला आहे. सध्या तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा धीम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाचे मोठे हाल होत आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी आणि बदलापूरमध्येही पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी आहे. मरीन ड्राईन्ह येथे समुद्रात जोरदार लाटा उसळत आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (हेही वाचा:School Holiday in Nagpur: नागपूरमध्ये मुसळधार पाऊस; शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर )

भारतीय हवामान विभाग (IMD) ने शनिवारी (20 जुलै) महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तविण्यात आला आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच प्रवास करावा लागतोय. पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.(हेही वाचा:Kokan Weather Forecast for Tomorrow:कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज! )

पोस्ट पहा

 

आयएमडीने शुक्रवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, "शनिवारी सकाळी वादळसदृश्य ही प्रणाली वायव्येकडे सरकून ओडिशा किनारपट्टी ओलांडून पुरीजवळ पोहोचणे अपेक्षित आहे. त्यानंतर, ओडिशा - छत्तीसगडमध्ये ती आणखी पश्चिम-वायव्येकडे सरकेल आणि हळूहळू कमकुवत होईल." समुद्रातील मंदीच्या आंतर्देशीय हालचालींना प्रतिसाद म्हणून, आयएमडीने हवामान अंदाज व्यक्त करताना शनिवारी तेलंगणा, मध्य महाराष्ट्र, किनारी गोवा आणि गुजरातसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. वीकेंडसाठी ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, कच्छ आणि सौराष्ट्रसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.