School Holiday in Nagpur: मुंबई पुण्यात धुवाधार पडणाऱ्या पावसाने नागपूरमध्येही जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे(Heavy rain in Nagpur) शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर (Holiday for schools and college)करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. नागपूर शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम विमान सेवेवरही झाला आहे. (हेही वाचा:Navi Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले; गुडघाभार पाण्यातून नागरिकांचा प्रवास (Watch Video) )
पोस्ट पहा
नागपूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस ; शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.
♦️ हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी. #NagpurRain pic.twitter.com/oPQ4bQu3pA
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 20, 2024
भारतीय हवामान विभाग (IMD) ने शनिवारी (20 जुलै) महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. परिणामी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Forecast) मुंबई शहर, उपनगरासह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईत पावासामुळे अनक ठिकाणी पाणी साचले(Waterlogging in Navi Mumbai) आहे. गुडघाभर पाण्यातून नागरिक वाट काढत आहेत. अनेक उपनगरीय रेल्वे सेवेवर पावसाचा परिणाम झाला आहे. लोकल उशीराने धावत आहे. त्यामुळे कामगारवर्गाला मनस्तापाला सामोर जावं लागत आहे. रस्त्यांवरही पाणी साचल्याने रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला आहे.