Navi Mumbai Rains: भारतीय हवामान विभाग (IMD) ने शनिवारी (20 जुलै) महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. परिणामी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Forecast) मुंबई शहर, उपनगरासह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईत पावासामुळे अनक ठिकाणी पाणी साचले(Waterlogging in Navi Mumbai) आहे. गुडघाभार पाण्यातून नागरिक वाट काढत आहेत. अनेक उपनगरीय रेल्वे सेवेवर पावसाचा परिणाम झाला आहे. लोकल उशीराने धावत आहे. त्यामुळे कामगारवर्गाला मनस्तापाला सामोर जावं लागत आहे. रस्त्यांवरही पाणी साचल्याने रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला आहे. (हेही वाचा:Weather Forecast India: महाराष्ट्र, गुजरात राज्यात मुसळधार पाऊस, हवामान अंदाज वर्तवताना IMD कडून Red Alert जारी)
व्हिडीओ पहा
#WATCH | Maharashtra: Severe waterlogging witnessed in Navi Mumbai amid heavy downpour pic.twitter.com/WzeJx9JyZL
— ANI (@ANI) July 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)