Kokan Weather Prediction, July 21: कोकणात आज ही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाची धुवाधार बॅटिंग चालू आहे. कोकणात पावसाने आता रौद्ररूप धारण केले आहे.कोकणातील काही भागांमध्ये सध्या आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. कोकणात आज तिसऱ्या दिवशी ही पावसाचा जोर कायम असून लोकांची खूप तारांबळ उडाली आहे. व प्रशासनाने लोकाना सतर्क रहाण्याचे आव्हान दिले आहेत.कोकणात महत्त्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांना पूर आल्याने पाणी थेट शेतात घुसू लागले आहे.या पावसामुळे आणि नदीला आलेल्या पुरामुळे कोकणवासीयांना घरातून बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजपासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात उदय ही पावसाचा जोर कायम रहाण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आता कोकणात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने कोकणात उद्याचे हवामान अंदाज लावला आहे.हेही वाचा: Pune Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
कोकणात उद्याचे हवामान कसे?
भारतीय हवामान विभाग (IMD) ने शनिवारी (20 जुलै) महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तविण्यात आला आहे.आयएमडीने शुक्रवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, "शनिवारी सकाळी वादळसदृश्य ही प्रणाली वायव्येकडे सरकून ओडिशा किनारपट्टी ओलांडून पुरीजवळ पोहोचणे अपेक्षित आहे. त्यानंतर, ओडिशा - छत्तीसगडमध्ये ती आणखी पश्चिम-वायव्येकडे सरकेल आणि हळूहळू कमकुवत होईल." समुद्रातील मंदीच्या आंतर्देशीय हालचालींना प्रतिसाद म्हणून, आयएमडीने हवामान अंदाज व्यक्त करताना शनिवारी तेलंगणा, मध्य महाराष्ट्र, किनारी गोवा आणि गुजरातसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. वीकेंडसाठी ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, कच्छ आणि सौराष्ट्रसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.