
Weather Update: राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून आता उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. याशिवाय, राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये उन्हाचा पार वाढणार आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती असणार असल्याची माहिती हवामान विभागाने (IMD) दिली आहे.
या जिल्ह्यात राहणार कोरडे हवामान -
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिवमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील ५ दिवसांसाठी कोणताही इशारा नाही. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD… भेट घ्या. pic.twitter.com/EmypTaeCMH
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 13, 2025
विदर्भात उष्ण आणि दमट हवामान -
याशिवाय, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्ध्यात उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तथापि, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्येही हवामान कोरडे असणार आहे.
मुंबईचे हवामान -
दरम्यान, 15 मार्च रोजी मुंबईतील आजचे तापमान 30.28 अंश सेल्सिअस आहे. दिवसाचा अंदाज अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान 26.99 अंश सेल्सिअस आणि 30.28 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. सापेक्ष आर्द्रता 49 % आहे आणि वाऱ्याचा वेग 49 किमी/तास आहे.