Captain Amarinder Singh | (Photo Credits: Facebook)

देशातील काही मोजक्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची पूर्ण सत्ता असलेल्या राज्यांपैकी एक राज्य म्हणजे पंजाब. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांच्या नेतृत्वाखाली पंजाब काँग्रेस ( Punjab Congress) सत्तेत आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये आता अंतर्गत कलह (Punjab Congress Politics) वाढू लागले आहेत. त्यातून पंजाब काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. केंद्रीय नेतृत्वाने वेळीच दखल घेत परिस्थीती नियंत्रणासाठी तीन सदस्यांची एक कमेटी पंजाबमध्ये पाठवली. या कमेटीने आपला अहवाल हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांन दिला आहे. मल्लिकार्जुन खडगे, जेपी अग्रवाल आणि हरीश रावत या तीन ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी हा अहवाल तयार केला आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, चार पानांच्या या अहवालामध्ये पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतू त्यांच्याविरोधात बंडखोरी होण्याची कोणतीही शक्यता नाही. दरम्यान, चर्चा आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंह हे मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. मात्र, नवजोत सिंह सिद्दू (Navjot Singh Sidhu) यांना उपमुख्यमंत्री अथवा प्रदेशाध्य पदाची लॉटरी लागण्याीच शक्यता काहीशी कमीच आहे.

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवरुन निर्माण झालेल्या प्रश्नाची दखल घेऊन नेमण्यात आलेल्या तीन सदस्यीय कमेटीने आपला अहवाल हायकमांडला पाठवला आहे. या अहवालात मुख्यमंत्र्यांनी नोकरशाहीच्या हाता दिलेल्या कारभाराला आवर घालण्याबाबत सांगितल्याचे समजते. त्यासोबतच पक्षामध्ये नवजोतसिंह सिद्धू यांच्या नाराजीवर मार्ग काढण्याबाबतचा निर्णय कमेटीने पक्षाध्यक्षांवर सोपविला आहे. सिद्धू यांच्या गोटातील आमदारांचीही फारशी एकी पाहायला मिळाली नाही. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, माज्या संपर्ण राजकीय कारकीर्दी मी विश्वास आणि पारदर्शकतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. (हेही वाचा, 'PM Narendra Modi हे देशाचे आणि भाजपचे अव्वल नेते आहेत, 7 वर्षांच्या यशाचे श्रेय त्यांनाच'- खासदार संजय राऊत)

प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, नवजोत सिंह सिद्दू हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेतृत्वाला स्थानिक पातळीवरन ते प्रादेशिक पातळीवर संधी देण्यासाठी पक्षात पुनर्रचना करण्यात यावी अशीही मागणी होत आहे. पक्षातील विविध समाज घटकांना समान संधी मिळाव्यात. तसेत एक प्रदेशाध्य आणि त्यांच्या जोडीला दोन कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात यावेत. यात एक दलित नेता असावा अशीही कमिटीने पक्षाध्यक्षांना शिफारस केल्याचे वृत्त आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, असेही वृत्त आहे की, केंद्रीय अध्यक्षांना पठवलेल्या अहवालात पंजाबमध्ये दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. तसेच या दोन्हीपैकी एक नेता दलित असावा आणि दुसरा सवर्ण असा सत्तेचा समतोल राखावा, असेही या अहवालात सूचविण्यात आल्याचे समजते.