Ganeshotsav 2019: प्रतिवर्षी प्रमाणे पुण्य नगरीतील बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Dagdusheth Halwai Ganpati Temple, Pune) काल 2 सप्टेंबर रोजी बाप्पा विराजमान झाला, या गणेशोत्सवाचे यंदा 127 वे वर्ष असणार आहे. आज ऋषी पंचमीच्या (Rishi Panchami) दिवशी तब्बल 25, 000 महिलांनी बाप्पाच्या समोर मंडपात अथर्वशीर्षाचे पठण केले. मंगळवारी, 3 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पारंपरिक पोशाखात, नऊवारी साडी व साज शृंगार करून महिलांनी बाप्पासमोर जमल्या होत्या. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे (Swapna Gore) यांनी देखील हजेरी लावली होती. यानंतर आज रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत समस्त वारकरी जागर कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. (Ganeshotsav 2019: पुण्यातील मानाचे पाच गणपती; जाणून घ्या प्रत्येक गणपतीचा इतिहास आणि महत्व)
ANI ट्विट
Maharashtra: 25,000 women recite 'Atharvashirsha' at Shrimant Dagadusheth Halwai Ganapati Temple in Pune. pic.twitter.com/tvfVQQxp06
— ANI (@ANI) September 3, 2019
यंदा दगडूशेठ मंदिराची प्रतिकृती वेद, पुराणे, शास्त्र यावर आधारित आहे. या सजावटीत उंच शिखरे, मंडप असलेले सूर्यमंदिर उभारण्यात आले आहे. स्तंभ, माळांची तोरणे, सिंह, लक्ष्मी या प्रतिकृतींनी मंदिर सजवले आहे. याशिवाय हत्ती, सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र या प्रतिकृतींचा देखील सुशोभीकरणात वापर करण्यात आला आहे. या सुंदर सजावटीच्या मधोमध सुवर्ण सिंहासनावर श्रीं ची मूर्ती विराजमान झाली आहे. (पुणे: येरवडा तुरुंगातील कैद्यांना गुरुजी तालीम मंडळाच्या बापाच्या आगमनात ढोल वादनाचा मान (Watch Video)
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या गणेशोत्सवाचे LIVE दर्शन
श्रीमंत दगडूशेठ गणपती हा पुण्याची ओळख आहे. 1893 साली लोकमान्य टिळकांनी या मंदिराच्या स्थापनेला मदत केली होती. तसेच या गणपतीची प्रतिष्ठापना देखील टिळकांनी केली आहे. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सव, गुढी पाडवा हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.