पुणे: येरवडा तुरुंगातील कैद्यांना गुरुजी तालीम मंडळाच्या बापाच्या आगमनात ढोल वादनाचा मान (Watch Video)
Yerwada Central Jail Prisoners Play Drum (Photo Credit: ANI)

Ganeshotsav 2019: "देवासमोर सर्व सारखेच" या विधानाची साक्ष देणारा एक प्रसंग आज पुण्यात (Pune) पाहायला मिळाला. पुण्य नगरीतील मानाचा मानला जाणारा गुरुजी तालीम (Guruji Talim Ganpati Mandal) मंडळाच्या बाप्पाचे आज सकाळी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. वास्तविक बाप्पाच्या आगमनाला ढोल वादनाचा कार्यक्रम तसा सर्वत्रच पाहायला मिळत असला तरी या मंडळाचा आजचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला, यामागील कारण म्हणजे आजच्या आगमन सोहळ्यात ढोल वादक हे चक्क येरवडा केंद्रीय कारागृहाचे कैदी होते. 30 कैद्यांच्या या वादक टीमने सलग दोन महिने सराव करून आज हा आगमन सोहळा लक्षणीय ठरवला.

अतिरिक्त पोलीस महासंचालकानी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व हे खुल्या कारागृहाचे कैदी आहेत. या सोहळ्याच्या सलग दोन महिने आधीपासून रोज त्यांची तालीम घेतली जात होती. या व्हिडिओची एक खास झलक ANI या वृत्तसंस्थेने देखील नुकतीच शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये सर्व कैदी हे पांढरे कुर्ते घालून ढोल वाजवताना पाहायला मिळत आहेत. या टीम मध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे.Ganesh Chaturthi 2019 Wishes: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव

ANI ट्विट

Lalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan Day 1: लालबागच्या राजाचं मुखदर्शन भाविकांसाठी खुलं; इथे पहा आरतीचं थेट प्रक्षेपण

दरम्यान, गुरुजी तालीम गणपती मंडळ हे पुण्यातील तिसरे मानाचे मंडळ म्हणून ख्यात आहे. लक्ष्मी रोड वरील गणपती चौकात या बाप्पाचे मंडप असून कित्येक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी पसरवण्यासाठी मंडळ कार्यरत आहे. या मंडळाची सुरुवातच दोन हिंदू आणि दोन मुस्लिम कुटुंबांनी एक्ट्राईट येऊन केली होती. वस्ताद नाळबंध आणि भिकू पांडुरंग देशपांडे यांनी सुरु केलेल्या या परंपरेला कित्येक वर्षांपासून जपले जात आहे.