Lalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan Day 1: लालबागच्या राजाचं मुखदर्शन भाविकांसाठी खुलं; इथे पहा आरतीचं थेट प्रक्षेपण
Lalbaugcha Raja (Photo Credits: Twitter/ Lalbaugcha Raja)

Lalbaugcha Raja 2019 Ganesh Pandal Aarti 2019: मुंबईचा लालबाग, परळ, गिरगाव या परिसरात गणेशोत्सवाच्या काळात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) पासून अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) पर्यंत धामधूम असते. बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने आता भव्य रूप धारण केलं आहे. सामान्यांपासून राजकारण, क्रीडा, कला जगतातील सेलिब्रिटींमध्ये विशेष आकर्षण असलेल्या 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja)  या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती आजपासून (2 सप्टेंबर)  दर्शनाला सज्ज झाला आहे. सकाळी 4 वाजता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. त्यानंतर 6 वाजल्यापासून गणेश भक्तांना दर्शन देण्यासाठी लालबागचा राजा सज्ज झाला आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. आता पुढील दहा दिवस लालबागच्या राजाचे दर्शन 10 दिवस सुरू राहील. प्रत्यक्ष लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ न शकणार्‍यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दर्शन खुलं करण्यात आलं आहे. लालबागच्या राजाच्या अधिकृत वेबसाईटसह, फेसबूक, ट्विटर  अकाऊंट च्या माध्यमातून लाईव्ह दर्शन, मंडपातील आरती पाहता येईल. Lalbaugcha Raja 2019 First Look: लालबागचा राजा 2019 ची पहिली झलक; चांद्रयान 2 च्या थीमवर आकर्षक सजावट

लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ यंदा 86 वा गणेशोत्सव साजरा करत आहे. 'नवसाला पावणारा गणपती' अशी ओळख असणार्‍या या गणपतीच्या दर्शनाला दरवर्षी लाखो गणेशभक्त हमखास भेट देतात. यंदाची गणेशभक्तांच्या सोयीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या वर्षी लालबागचा राजा मंडपाची सजावट आणि देखावा इस्त्रोच्या 'चांद्रयान 2' या चंद्रमोहिमेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. यामध्ये बाप्पाच्या आसपास हलणारे आंतराळवीर विशेष आकर्षण आहे. Ganesh Chaturthi 2019 Wishes: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव

लालबागच्या राजाचं मुखदर्शन 

लालबागच्या चिंचोळ्या मसाला गल्लीमध्ये दहा दिवस गणेश भक्तांना दर्शन देण्यासाठी विराजमान झालेल्या या राजाचे रूप पाहण्यासाठी मुखदर्शन रांग आणि नवसाची रांग अशा दोन वेगवेगळ्या रांगा असतात. सामान्यांना दहा दिवस मोफत लालबागच्या राजाचं दर्शन घेता येतं. दरवर्षी अमिताभ बच्चन आणि कुटुंबीय, सचिन तेंडुलकर, शंकर महादेवन, शिल्पा शेट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात.