
गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे घरगुती हिंसाचार (Domestic Violence), कुटुंबातील सदस्यांकडून होणारा अपमान, मानसिक विकार, भावनिक आवेगांबद्दलच्या महिलांच्या तक्रारी आणि इतर समस्या वाढल्या आहेत. मात्र आता सल्लागार म्हणत आहे की, गेल्या काही महिन्यांपासून पुरुषांमध्ये घरगुती समस्या व कामाशी संबंधी तणाव वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अनेक लोक घरातूनच काम करीत आहेत, त्यामुळे हा तणाव वाढला आहे. यामध्ये चिंतेची बाब म्हणजे आता पत्नीकडून पुरुषांवर होणार्या छळाच्या घटनांमध्ये 6 पट वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरात गेल्या दीड वर्षात घरगुती भांडणाचे तीन हजाराहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 1535 पतींनी पत्नीविरोधात दाखल केले आहेत, तर 1540 गुन्हे पत्नींनी पतींवर दाखल केले आहेत. या घरगुती वादांपैकी बहुतेक प्रकरणे पोलिसांनी सोडविली. परंतु बरीच प्रकरणे कोर्टापर्यंत पोहोचली. या जोडप्यांमध्ये दीड वर्षापूर्वी फार कमी भांडणे होत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पती त्यांच्या ऑफिसमध्ये तरी बायका घरात आनंदी असायच्या. मात्र लॉकडाऊनमध्ये दोघेही सदैव एकत्र आल्याने त्यांच्यात भांडणे होत आहेत.
महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना संकटात मदत करण्यासाठी पुणे पोलिसांच्या ट्रस्ट सेलचे अधिकारी व समुपदेशक म्हणाले की, गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पुरुष अधिक तक्रारी घेऊन येत आहेत. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनपूर्वी एका वर्षात 1283 लोकांनी कौटुंबिक कलहाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. यापैकी पत्नींची संख्या 791 आणि 251 पतींची संख्या होती. परंतु लॉकडाऊनमध्ये ही संख्या 3075 झाली आहे. (हेही वाचा: नागपूर मध्ये 35 वर्षीय महिलेने 25 दिवस Ventilator आणि 45 दिवस हॉस्पिटल मध्ये कोविड 19 शी सामना करून मिळवला आजारावर विजय; वाचा तिचा प्रेरणादायी संघर्ष)
पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेकदा प्राणघातक हल्ला, शिवीगाळ केल्याच्या तक्रारी येत असतात. कधीकधी पुरुष अशा तक्रारी घेऊन येतात की, पत्नी भांडण करून माहेरी गेली आहे व परत यायचे नाव घेत नाहीये. अशावेळी पोलीस दोघांनाही एकत्र बसवून त्यांचे समुपदेशन करतात. सहसा, पती-पत्नीमधील असे वाद पुणे पोलिसांच्या विशेष कक्षाद्वारे सोडविले जातात, ज्याला ट्रस्ट सेल म्हणतात. पुणे पोलिसांच्या या विशेष कक्षाची स्थापना 9 जानेवारी 2019 रोजी करण्यात आली होती.