नागपूर मध्ये 35 वर्षीय महिलेने 25 दिवस Ventilator आणि 45 दिवस हॉस्पिटल मध्ये कोविड 19 शी सामना करून मिळवला आजारावर विजय; वाचा तिचा प्रेरणादायी संघर्ष
COVID 19 | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेमध्ये रूग्णांची झालेली गंभीर अवस्था चिंताजनक होती. पण या कठीण काळामध्येही अनेकांनी केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कोविड 19 वर मात केल्याचं पहायला मिळालं आहे. नागपूरमध्ये 35 वर्षीय महिलेने कोविडसोबत 45 दिवस हॉस्पिटलमध्ये आणि 25 दिवस वेंटिलेटर वर काढून कोरोनाला हरवले आहे. स्वप्ना रसिक असं त्याचं नाव असून 24 एप्रिल पासून त्या कोविड 19 शी झुंजत होत्या. दरम्यान हॉस्पिटलमध्ये असताना अनेकदा त्यांची प्रकृती वर खाली झाली पण केवळ 5 वर्षाच्य त्यांच्या चिमुरडीकडे पाहून त्यांनी जगण्याची हिंमत कठीण काळातही सोडली नसल्याचं त्यांनी TOI सोबत बोलताना म्हटलं आहे.

टाईम्स ऑफ इंडिया च्या वृत्तानुसार, 24 एप्रिल ते 9 जून असा 45 दिवस स्वप्ना लढत होत्या. 19 एप्रिलला त्यांना कोविड चे निदान झालं. सुरूवातील होम क्वारंटीन राहूनच त्यांनी उपाय केले पण हळूहळू त्यांचा त्रास वाढला. KRIMS hospitalमध्ये त्यांना काही दिवसांनी बेड मिळाला. त्यावेळेस दोन्ही फुफ्फुसांवर संसर्ग प्रचंड वाढला होता. SpO2 पातळी देखील 80 च्या खाली गेली होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. 25 दिवस त्यांना पूर्ण क्षमतेने ऑक्सिजनवर ठेवले. अशाप्रकारे 25 दिवस ऑक्सिजन वर राहून आजारावर मात करणारी ही घटना विरळच आहे. COVID 19 In Nagpur: 85 वर्षीय कोरोनाबाधित नारायणराव दाभाडकर यांनी माणूसकी जपली; तरूणाला जीवदान देण्यासाठी ऑक्सिजन बेड त्यागला; 3 दिवसांनी मृत्यूला कवटाळलं.

स्वप्ना यांच्या बाबतीत अजून एक चांगली बाब म्हणजे इतका काळ ऑक्सिजन सपोर्टवर राहून देखील त्यांना कोविड 19 नंतर म्युकरमाईकोसिस सारख्या आजाराचा सामना करावा लागला नाही. स्टिरॉईडचा योग्य वापर केल्यास काळ्या बुरशीला लांब ठेवता येतं हे या केसमधून पुन्हा समोर आलं आहे. तुलनेत वय कमी आणि सहव्याधींचा धोका नसल्याने स्वप्ना ला आजारातून बाहेर काढणं ही डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश देत गेलं. आई म्हणून स्वप्नाची तिच्या लेकीकडे परतण्याची इच्छा प्रेरणादायी होती असे देखील डॉक्टर सांगतात.