मागील दीड वर्षांपासून अवघं जग कोरोनाशी दोन हात करत 'न्यू नॉर्मल' लाईफ शिकत आहे. सध्या कोविड 19 ची दुसरी लाट त्सुनामी सारखी अंगावर आली आहे. यामध्ये वाढती रूग्णसंख्या आणि त्यासमोर ढेपाळलेली आरोग्ययंत्रणा यामधूनही वाट काढत अनेकजण कोरोनावर मात करत आहेत. या अस्मानी संकटामध्ये पैसा, ओळख, जात, पात, धर्म या कशाचीच नाही तर 'माणूसकी'ची किंमत होत आहे. नागपूरात एका 85 वर्षीय कोरोनाबाधिताने देखील याच माणूसकीचं दर्शन घडवलं आहे. स्वतःची अवस्था चिंताजनक असतानाही त्यांनी आपला ऑक्सिजन बेड तरूणाला देत कोविडविरूद्धच्या लढाईमध्ये 3 दिवसांनी जगाचा निरोप घेतला आहे. सध्या त्यांच्या या कृतीला सोशल मीडियातून सलाम करत आदरांजली अर्पण केली जात आहे.
नारायण भाऊराव दाभाडकर हे 85 वर्षीय गृहस्थ कोरोनाच्या विळख्यात आले. त्रास बळावत गेला आणि त्यांची ऑक्सिजन लेव्हल 60 पर्यंत खाली आहे. दाभाडकर यांच्या कुटुंबियांनी मोठी धावधाव करत इंदिरा गांधी शासकीय हॉस्पिटल मध्ये बेड मिळवला. उपचार सुरू होणार इतक्यातच एक महिला आपल्या 40 वर्षीय पतीला घेऊन आली. बेड नसल्याने त्याला अॅडमीट करून घेऊ शकत नाही असे हॉस्पिटलने कळवलं. ती रडायला लागली. हा प्रकार नारायण भाऊराव दाभाडकर यांच्यासमोरच घडला त्यांनी स्वतःचा बेड या तरूणासाठी रिकामा करून उपचार सुरू करण्यास सांगितले. हॉस्पिटलमधून निघताना त्यांनी हा निर्णय स्वेच्छेने घेत असल्याचं एका कागदावर लिहून दिलं. पुढे 2-3 दिवस त्यांच्यावर घरीच उपचार झाले पण त्यांचे या आजारात निधन झाले.
नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी देखील या प्रकराची दखल घेतली. आज त्यांच्या निधनाची पुष्टी त्यांनी ट्वीट करत केली. यावेळी 'दुसर्यांच्या दु:खांसमोर आपली दु:ख लहान समजून त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारी लोकं फार कमी असतात. असा प्रकार केवळ रक्तांच्या नात्यामध्ये नाही तर माणूसकीच्या नात्यामध्येही दिसतो. नारायण राव त्यापैकीच एक होते' असे ट्वीट नितीन राऊत यांनी करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. अहमदनगर मधील डॉक्टारांचे Prescription Viral; ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून औषधांसोबत दिला 'हा' खास सल्ला (See Pic).
नितीन राऊत ट्वीट
दुनिया में ऐसे लोग कम ही होते हैं जो दूसरे के दुख को अपने दुख से बड़ा समझते हैं। उनके दुखों के लिए अपनी जान तक त्यागना मंजूर कर लेते हैं। ऐसा सिर्फ खून के रिश्तों में नहीं होता कई बार इंसानियत के रिश्तों में भी दिख जाता है। नारायण भाऊ उन्हीं में से एक हैं।
सल्यूट भाऊराव साहब 🙏 pic.twitter.com/qlxt5AImsd
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) April 28, 2021
इंसान तो हर घर में पैदा होते हैं किंतु इंसानियत कहीं कहीं ही जन्म लेती है!
नारायण भाउराव जी आप मरकर भी अमर हो गए🙏
ईश्वर अपने चरणों में स्थान दे विनम्र श्रद्धांजलि🙏💐
— Shakuntala Sahu MLA (@ShakuntalaSahu0) April 28, 2021
नागपूर मध्ये कोरोनाची स्थिती बिकट आहे. नागपूर मध्ये काल देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 6,287 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 101 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6863 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. एकूण अॅक्टिव्ह रूग्ण 76 हजारांच्या वर आहे.