Pune Accident News PC TWITTER

Pune Accident:  पुण्यात एक भीषण अपघात घडला आहे. हा अपघात जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या टॅंकरनी दुचाकीस्वारासह रस्त्यावरून पायी चालणाऱ्या तरुणांना धडक दिली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे आणि दोन ते तीन जण जखमी झाले आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.( हेही वाचा- जळगावात भाविकांच्या कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चार जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरात हा अपघात घडला. मित्रासोबत दुचाकीवरून जात समोरू भरधाव येणाऱ्या ट्रॅंकरची धडक लागली. यात धडक इतकी भीषण होती की, यात एकाचा मृत्यू झाला. ही घटना संपुर्ण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पाण्याच्या टॅंकर विरुध्द दिशेने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा घात घडला. भरधाव गाडीचे नियत्रंण सुटले आणि जोरात दुचाकीस्वाराला धडक बसली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुणाच्या अंगावरून गाडीचे चाक गेले आहे.

अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या तरुणाना रुग्णालयात पाठवले आणि मृताला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून टॅंकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इतकी भीषण होती की, तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. राजेंद्र तुकाराम बोंडे असं मृत तरुणाची ओळख पटली आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.