Jalgaon Accident: जळगावात भाविकांच्या कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चार जखमी
Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Jalgaon Accident: जळगाव जिल्ह्यात भीषण अपघाता झाल्याची माहिती समोर येत आहे. गावात मंदिर उभारणी झाल्याने प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी शिवलिंग आणणासाठी गेलेल्या गावकऱ्यांचा अपघात झाला.मंदिरात शिवलिंग घेण्यासाठी मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे जाणासाठी गावकरी निघाले होते मात्र घरापासून काही अंतरावर पोहचताच अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. हेही वाचा- ‘टोईंग व्हॅन’ कर्मचाऱ्यांची 'दादागिरी', दुचाकीवर बसलेल्या युवकाला तिघांची मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटेनगर परिसरातील साईनगर या भागात हा अपघात झाला. भूषण सुभाष खंबायत 35,  विजय हिम्मत चौधरी (40), तुषार वासुदेव जाधव (28) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर जण गंभीर जखमी झाले आहेत. खोटेनगरच्या साईनगर येथे मंदिर उभारणी करण्यात आली आहे. मंदिराचे काम पूर्ण झाल्याने शिवलिंग घेण्यासाठी मध्य प्रदेशातसाठी निघाले होते तेव्हा ही घटना घडली. खासगी गाडी ते सात ते आठ जण गावातून जात होते.

सकाळी पावणे सातच्या सुमारास गावातून गाडी निघाली होती. देवाचा नामस्मरण करत गाडी निघालीच होती. तेवढ्यात अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर बांभोरी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने भाविकांच्या गाडीला जोरात धडक दिली.या धडकेत गाडीचे संपुर्ण नुकसान झाले आणि तीन जणांचा जागीचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती गावात देताच गावात एकाच खळबळ उडाली. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात रुग्णालयात उपचार सुरु आहे अशी माहिती समोर आली आहे.