Nagpur Shocker : नागपूरमध्ये तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंगा पुतळा चौकात युवक दुचाकीवर बसलेला असतानासुद्धा ती दुचाकी टो(Towing Bike) करण्याची कारवाई करण्यात आली. दुचाकी उचलून कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅनच्या तीन कर्मचाऱ्यांनी युवकासोबत वाद घातला. त्या दरम्यान, त्यांच्यात वाद झाला.शेवटी कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करत त्या युवकाला मारहाण केली. त्यावेळी वाहतूक पोलिसही (Traffic Police)घटनास्थळी उपस्थित होते. सदर प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून टोईंगच्या नावावर वाहतूक पोलिसांची हजेरी असतानाही खुलेआम गुंडगिरी सुरू असल्याचे दिसून येते. (हेही वाचा:Mumbai Traffic Police हवालदाराने टॅक्सी चालकांकडून पैसे घेतल्याचा दावा, व्हिडिओ व्हायरल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagpur Today (@nagpur_today)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)