Pune: महसुल अधिकारी असल्याचे भासवत महिलेने दाम्पत्याला 27.5 लाखांना लुबाडले; आरोपी अटकेत
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महसुल अधिकारी (Revenue Officer) असल्याचे भासवत पुण्यातील (Pune) एका महिलेने एका दाम्पत्याला लाखो रुपयांना लुबाडले आहे. ही महिला पुण्यातील येरवडा (Yerwada) परिसरात राहते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या महिलेने सरकारी जमिनी स्वस्त दरात खरेदी करुन देते असे सांगून दाम्पत्याला तब्बल 27.5 लाखांचा गंडा घातला आहे. अनिता भिसे (Anita Bhise) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. पीडित दाम्पत्य देखील आरोपी महिलेच्याच परिसरात राहत असून ते कम्प्युटर कोचिंग सेंटर चालवतात. तर आरोपी महिला गृहिणी आहे. (धक्कादायक! तब्बल 19 लोकांशी लग्न करून महिलेने घातला 2 कोटींपेक्षा जास्त रुपयांना गंडा; समोर आला मोठा Marriage Scam)

सरकार सामान्य लोकांसाठी शहरातील जमिनी स्वस्त दरात विकत असल्याचे आरोपीने दाम्पत्याला सांगितले. जमिन खरेदी करण्यात दाम्पत्याने रस दाखवला. त्यानंतर हे नाटक खरे भासावे म्हणून तिने या वर्षाच्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात दाम्पत्याला जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयात बोलावले. त्यांच्याकडून ऑक्टोबर 2020 आणि जुलै 2021 मध्ये पैसे घेतले. शहरात जमिन मिळवून देते असे वचन देत तिने 27.50 लाख रुपये कॅश स्वरुपात घेतले. पैसे मिळाल्यानंतर महिलेने पीडितांना सरकारी तिजोरीच्या बनावट पावत्या दिल्या. त्याचबरोबर तिने जागेचे बनावट कागदपत्रंही पीडित दाम्पत्याला दिले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (पुणे: डेटिंग अॅपच्या माध्यमातून नाव बदलून तरुणीची फसवणूक; 10 लाखांना घातला गंडा)

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आपीसी कलम 420, 465, 468 आणि 472 अंतर्गत महिलेला अटक केली आहे. त्याचबरोबर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यात अजून काही लोक सहभागी आहेत का, याचाही शोध घेत आहेत.