Maharashtra: कोरोना व्हायरसच्या काळात काही परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. औषध ते उपचारासाठी प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच महाराष्ट्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार असे समोर आले की, कोरोना झालेल्या 75 टक्के रुग्णांकडून खासगी रुग्णालयात अधिक बिलाची रक्कम उकळली गेली आहे.(Mumbai: कोविड-19 प्रोटोकॉलसह 4 ऑक्टोबरपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचा BMC चा आदेश; मार्गदर्शक सुचना जारी)
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटना जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभय शुक्ला यांनी म्हटले की, जवळजवळ (सर्वेक्षणात सहभागी झालेले रुग्ण) अर्ध्या लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी असे म्हटले की, आम्ही 2579 रुग्णांवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांसोबत सुद्धा बातचीत केली. रुग्णालयातील बिलाचे ऑडिट केले. त्यामध्ये असे कळले की, 95 टक्के रुग्ण खासगी रुग्णालयातील होते.
डॉ. शुक्ला यांनी सर्वेत असे म्हटले की, 75 टक्के रुग्णांच्या उपचारासाठी बिलापेक्षा अधिक रक्कम उकळली गेली. जवळजवळ 10 हजार ते एक लाख रुपयांचे बिल वसूल केले गेले. त्यामध्ये बहुतांश रुग्ण हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी रुग्णालयात भरती केले गेले. डॉ. शुक्ला यांनी दावा केला की, रुग्णांमध्ये कमतीत कमी 220 महिला अशा होत्या ज्यांना वास्तविक बिलापेक्षा एक लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत अधिक बिल दिले. तर 2021 प्रकरणांमध्ये रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी दोन लाख रुपये अधिक दिले.(मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या जीवालाधोका, मुंबई पोलिसांना फेक कॉल)
शुक्ला यांनी असे म्हटले की, महाराष्ट्र सरकारने घोषणा केली होती खासगी रुग्णालयात कोविड19 च्या उपचारासाठी दर ठरवले आहेत. मात्र तरीही रुग्णांकडून बिलाची अधिक रक्कम उकळली गेली. काही रुग्णांसह परिवारासमोर आर्थिक संकट उभे राहिले. त्यासाठी त्यांना आपले दागिने सुद्धा विकावे लागले. नातेवाईक किंवा सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. सर्वेक्षणानुसार 1460 रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना या स्थितीतून जावे लागले आहे.