प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

4 ऑक्टोबरपासून मुंबईत (Mumbai) शाळा सुरू करण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शाळा बंद होत्या. आता इतके महिने घरात कैद असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तर दिसणार आहे. 31 मार्च 2020 पासून मुंबईत शाळा पूर्णपणे बंद होत्या, तेव्हापासून मुले घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत होती. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी बुधवारी सांगितले की, 4 ऑक्टोबरपासून मुंबईत 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा उघडल्या जातील. उर्वरित वर्गांसाठी, बीएमसी नोव्हेंबरमध्ये निर्णय घेईल. ते म्हणाले की, सरकारने जारी केलेल्या सर्व कोरोनासाठी एसओपी लागू केले जातील.

लॉकडाऊनचा एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय/खाजगी व्यवस्थानाच्या अनुदानित विना अनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत शाळा/कनिष्ठ महविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग दि 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. निर्णयामधील मार्गदर्शक सूचना सोबतच खालीलप्रमाणे अन्य सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

    • बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना उपस्थित ठेवावे.
    • शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडण्यात आलेल्या ( परिशिष्ट अ व ब ) नुसार कार्यवाही करण्यात यावी.
    • बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडीयम हायपोक्लोराईड सोल्युशनने निर्जतुंकीकरण करुन घेण्यात यावे तसेच, इतर व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर वर्गांचे निर्जतुंकीकरण करुन घ्यावे.

  • बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये इ. 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांमधील कोविड लसीकरण केंद्र व कोविड विलगीकरण कक्ष सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने अन्य ठिकाणी स्थलांतरीत करुन वापरण्यायोग्य सुस्थितीत करावे.
  • कोविड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोविड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी तसेच, निवडणुक विषयक कामासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक कर्मचा-यांना कार्यमुक्त करुन घ्यावे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका अधिपत्याखालील शाळांनी आपल्या शाळांमधील इ. 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा नजीकच्या महानगरपालिकेच्या किंवा खाजगी आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. (हेही वाचा: FYJC Admission 2021: राज्यात आजपासून अकरावी प्रवेशासाठी FCFS फेरीला सुरुवात)
  • सर्व शाळांनी इ. 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या संदर्भ क्र. 1 ते 5 मधील परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांनुसार तयारी झाल्याबाबतची खातरजमा करावी.