Pandharpur: प्रियकराच्या मदतीने तरुणीची वडिलांना बेदम मारहाण
Crime | (File image)

Pandharpur Crime: प्रेम प्रकरणास विरोध केल्याने प्रियकराच्या मदतीने चक्क आपल्याच वडिलांना मुलीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक झालेल्या बेदम मारहाणीत वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे प्रियकराच्या मदतीने वडिलांना मारहाण करण्याचा कट रचणारी मुलगी उच्चशिक्षित आहे. तिने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. तसेच ती स्वतंत्र व्यवसायही सांभाळत होती. व्यवसायाच्या कामानिमित्तच ती पुण्याला गेली होती. पुण्याहून परतताना उशीर झाल्याने तिचे वडील तिला घ्यायला आले होते. मात्र रस्त्याने जाताना मुलीने एका ठिकाणी गाडी अचानक थांबवली आणि ती खाली उतरली. या वेळी तिच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने अचानकपणे वडीलांवर हल्ला केला.

घडल्या प्रकाराबद्दल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच खळबळही उडाली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीन दिलेल्या लाईव्ह वार्तांकनात म्हटले आहे की, माढा तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शाह यांच्यासोबत ही घटना घडली. महेंद्र शाह यांच्या मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. या संबंधातून ती त्याच्याशी आंतरजातीय विवाह करु इच्छित होती. मात्र, त्यास वडिलांचा (महेंद्र शाह) विरोध होता. दरम्यान, तरुणी उच्चशिक्षीत असल्याने ती व्यवसायही पाहात होती. व्यवसायाच्या कामासाठी ही तरुणी पुणे येथे गेली होती. पुण्याहून परतताना तिला उशीर झाला. त्यामुळे तिचे वडील तिला घ्यायला आले होते. त्यांनी तिला शेटफळे गावाजवळ उतरण्यास सांगीतले होते.

दरम्यान, वडिलांसोबत जाताना मुलीने रस्त्यात गाडी मध्येच थांबवली आणि ती गाडीतून खाली उतरली. तिच्यासोबत वडीलही खाली उतरले. याच वेळी काही अज्ञात तरुण तेथे आले आणि त्यांनी वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच तातडीने पावले उचलण्यात आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुलगी आणि तिच्या प्रियकरासह त्यांच्या इतरही सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे.