पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर (vitthal rukmini Mandir) परिसरात मंदिर संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीसाठी येत्या शुक्रवारपासून पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. पंढरपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माध्यमांना दिली. (हेही वाचा - Pandharpur Kartiki Ekadashi Yatra 2023: यंदा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या दरम्यान पंढरपूर येथे होणार कार्तिकी यात्रा; भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचना)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या काम वेगाने सुरू झाले आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे मंदिर समितीने येत्या 15 मार्चपासून सुमारे दीड महिना देवाचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरामध्ये सर्व नित्योपचार सुरू राहणार आहेत. सकाळी पाच ते 11 पर्यंत भाविकांना मुख दर्शन घेता येईल असेही मंदिर समितीने स्पष्ट केले.
दरम्यान या कामाच्या काळात देवाच्या मूर्तीला काचेचे आवरण केले जाणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मंदिर संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. देवाच्या मूर्तींचे आयुष्य वाढवण्यासाठी सदरचे काम हे केले जाणार आहे.