
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांनी खरोखरच ठार मारायचा प्रयत्न केला होता काय? याबाबत प्रसारमाध्यमांनी दस्तुरखूद्द सोनू निगम (Sonu Nigam) यांनाच विचारले. यावर प्रतिक्रियेदाखल सोनू निगम काय उत्तर देतात याबाबत उपस्थितांना उत्सुकता होती. मात्र, एक शब्दही न बोलता सोनू निगम यांनी या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे ऑन कॅमेरा सोनू निगम यांनी आपले डोळे आणि चेहऱ्यावरचे भाव असे काही बदलले की, त्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाहीमध्ये समजने पत्रकारांना कठीण झाले. सोशल मीडियावर सोनूच्या या प्रतिक्रियेबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एका मुलाखतीदरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गायक सोनू निगम याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी काही शिवसैनिक गेलेही होते. सोनू निगम याचे ठाकरे कुटुंबासोबत काय संबंध आहेत? असा आरोप राणे यांनी केला होता. दरम्यान, आनंद दिखे यांच्या अपघाती मृत्यूबाबतही निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जबाबदार धरले होते. (हेही वाचा, आनंद दिघे यांना कोणी मारलं? सोनू निगमच्या हत्येचा कट कोणी रचला? निलेश राणे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप)
दरम्यान, निरेश राणे यांच्या आरोपांवर शिवसेनेच्या गोटातून अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, शिवसेना नेत्यांनी खासगीत बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आगाच काहीतरी आरोप आणि टीका करत कोणी गलीच्छ राजकारण करायचा प्रयत्न करत असेल तर त्यावर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही. पण, असे आरोप करणाऱ्यांना जनता उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया दिल्याचे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. त्यामुळे आता राणे यांच्या आरोपांवर सोनू निगम काय प्रतिक्रिया देणार याबाबत उत्सुकता होती.