Lightning in Mumbai (PC - Instagram/@mitalimayekar)

Netizens Share Picture of Lightning in Mumbai: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा आणि विजेचा गडगडाटामुळे अनेक ठिकणी नुकसानजन्य परिस्थिती उद्धभवली आहे. मुंबईत गुरुवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. मुंबईकरांना उष्ण आणि दमट वातावरणातून पावसाने दिलासा दिला. पश्चिम उपनगरात केंद्रित झालेल्या मुसळधार पावसाने एप्रिल महिन्याचा सर्वात ओलावा ठरण्याचा शहराचा 49 वर्षांचा विक्रम मोडला.

भारतीय हवामान विभागाच्या मते, शनिवारी दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत मुंबई शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. अवकाळी पावसादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, मुंबईत पाऊस आणि ढगांचा गडगडाट नेटिझन्सनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. शहरात विज पडतानाची दृश्य नेटकऱ्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ही दृश्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटीझन्स या फोटोंजवर लाईक तसेच कमेंन्ट करत आहेत. (हेही वाचा - Maharashtra Weather Forecast: राज्यात आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची, तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता)

दरम्यान, मराठी अभिनेत्री मिताली मयेकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शहरात वीज पडतानाचे काही फोटोज पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर आणखी काही फोटो व्हायरल होत आहेत. निसर्गाचं हे रुप पाहून तुम्हाला नक्कीचं आश्चर्य वाटेल. या फोटोंना हजारो लाईक मिळाल्या असून मुंबईकर मोठ्या प्रमाणावर हे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत आहेत.