नवी मुंबईतील कोपरखैराणे येथील एका व्यक्तीने ऑनलाईन शॉपिंगची उपशाखा सुरु करण्याच्या नादात तब्बल 1 लाख रुपयांहून अधिक रक्कम गमावली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. मंगळवारी या प्रकरणी पोलीस स्थानकात विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर कॅफेचे मालक संदीप यांना कोरोनाच्या काळात फार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे नफा कमवावा याच्या विचाराने त्यांनी ऑनलाईन शॉपिंगबद्दलचा विचार करत त्याबद्दल अधिक माहिती जमा केली.
संदीप यांना इंटरनेटवर जीओमार्ट सारखी दिसणारी एक खोटी वेबसाईट मिळाली. यावर त्यांनी वेबसाईट्सवर देण्यात आलेल्या क्रमांवरील व्यक्तीशी संपर्क साधला. दोघांमध्ये बोलणे झाल्यावर फोनवरील व्यक्तीने संदीप यांनी डिस्ट्रिब्युटरशीप मिळवण्यासाठी प्री-टॅक्स अंतर्गत पैसे भरण्यास सांगितले.(Mumbai: मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करणारे 3 आरोपी अटकेत)
पोलिसांनी या प्रकरणी माहिती देत असे म्हटले की, सोनावणे हे फोनवरील व्यक्तीच्या बोलण्याला बळी पडले आणि त्यांनी डील सुद्धा केली. तर फसवणुकदाराने त्याचे जिओमार्टचे बँक खाते अंधेरीत असल्याचे सांगितले. सोनावणे यांना 22 जुलै रोजी www.jiomartfranchise.in ही वेबसाईट मिळाली आणि त्यांना ती आवडली सुद्धा. यावर त्यांनी हवे असलेले सर्व डिटेल्स देत दोन दिवसांनी फसवणूकदाराला फोन केला.
आरोपीने स्वत:चे नाव संजीव असे सांगत त्यांनी सोनावणे यांच्या ईमेल आयडीवर कागदपत्रे पाठवली. 27 जुलैला सोनावणे यांना ऑफिसच्या पत्त्यासह एक कन्फर्मेशन संदर्भातील ईमेल आला. या ईमेल मध्ये जिओमार्ट फ्रॅन्चाईज ड्रिस्टीब्युटर्सचे बँक खाते क्रमांक मिळाला आणि त्यांनी 32,500 रुपयांची रक्कम पाठवली. तर दोन दिवसांनी पुन्हा सोनावणे यांना एक ईमेल येत त्यात 69,900 रुपये अॅग्रीमेंट्साठी देण्यास सांगितले.(Nhava Sheva: नावा शेवा बंदरातून एक हजार कोटी रुपये किमतीचे 191 किलो ड्रग्ज जप्त)
या सर्व दिवसांदरम्यान, सोनावणे यांनी जेव्हा आरोपीला फोन केला त्याने त्यांना खोटी आश्वासने दिली. पोलिसांच्या मते सोनावणे यांनी 5 ऑगस्टला अजून एक ईमेल येत त्यात 1,25,500 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी मात्र सोनावणे यांना संशय येत त्यांनी आरोपीला भेटूनच पैसे देऊ असे म्हटले. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याने सांगितले असून दिलेला पत्ता सुद्धा अस्तित्वात नसल्याचे म्हटले आहे.