Mumbai: मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करणारे 3 आरोपी अटकेत
Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) मधील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर (Mankhurd Ghatkopar Link Road) 29 जुलै रोजी अल्पवयीन मुलीवर चालत्या गाडीत सामुहिक बलात्कार करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 376(D) आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत 3 जणांना अटक केली आहे. दरम्यान कोर्टाने आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 29 जुलै रौजी 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रस्त्यावर फिरत असताना एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. त्यात बसलेल्या 3 जणांनी तिला गाडीत ओढले. तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्यानंतर तिला इस्टर्न एक्सप्रेस हायवे वर सोडण्यात आले. याप्रकरणी मागील आठवड्यात मानखुर्द पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मानखुर्द-शिवाजी नगर परिसरात आरोपींचा शोध घेतला. 8 ऑगस्ट रोजी तिघांनाही अटक करण्यात आली. (धक्कादायक: दिल्लीत 13 वर्षांच्या मुलीवर दोघांचा बलात्कार; कात्रीने वार करून खुनाचा प्रयत्न; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली पिडीतेची भेट)

ANI HindiNews Tweet:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक मेस्त्री, एक वाहन चालक तर एक बेरोजगार आहे. या घटनेसाठी वापरल्या गेलेल्या गाडीला टी परमिट मिळाले असल्याने या गाडीचा टॅक्सी म्हणून वापर करण्यात येत होता.