नंदुरबार लोकसभा मतदारसंघ: भाजपच्या डॉ. हीना गावित यांना काँग्रेस उमेदवार के. सी. पाडवी यांचे आव्हान, अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांच्यामुळे निवडणुकीत रंगत
Nandurbar Lok Sabha Constituency Congress Candidate Adv. K C Padavi, BJP Candidate Dr. Heena Gavit | (Photo Credit: Facebook)

Nandurbar Lok Sabha Constituency: अनुसुचित जाती जनसातीसाठी आरक्षित असलेला नंदुरबार लोकभा मतदारसंघ केवळ 2014 चा अपवाद वगळता काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. उपलब्ध माहितीनुसार 1962 पासून 2009 वर्षापर्यंत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवारच निवडूण आला आहे. 2014 ला अपवाद घडला आणि डॉ. हीना गावित यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडूण आला. पण, डॉ. हिना गावीत आणि त्यांच्या कुटुंबाजी राजकीय जडणघडण ही काँग्रेस विचारधारेतच झाली आहे. लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) मध्येही विद्यमान खासदार डॉ. हीना गावित (Dr. Heena Gavit) या भाजप तिकीटावर निवडणूक रिंगणात आहेत. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार अॅड. के. सी. पाडवी (Adv. K C Padavi) यांचे आव्हान आहे. परंतू, म्हणून काही हा सामना दुरंगी होईल असे नाही. डॉ. सुहास नटावदकर हेसुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. या लढतीचा घेतलेला हा आढावा.

भाजपने डॉ. हीना गावित यांना तिकीट देऊन त्यांच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. डॉ. हीना गावित यांनी 2014 मध्ये काँग्रेस उमेदवार माणिकराव गावित यांना 1,06,905 इतक्या मताधिक्याने पराभूत केले होते. हीना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. विजयकुमार गावित हे पुढे भाजपमध्ये सहभागी झाले. आता ते नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचारकी चेहरा. सत्तेत असल्यामुळे मतदारसंघात झालली विकास कामे आणि शिवसेनेसोबत झालेली भाजपची युती त्यामुळे एकत्र आलेले घटक आदींचा विचार करता डॉ. हीना गावित यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे.

दुसऱ्या बाजूला निवडूक अचारसंहिता आणि मतदानाची प्रत्यक्ष तारीख जाहीर होण्याच्या आगोदरच तिन महिन्यांपासून काँग्रेसने या मतदारसंघात रणनिती आखण्यास सुरुवा केली होती. डॉ. हीना गावित यांना भाजप पुन्हा संधी देणार का याबाबत संभ्रम असतानाच काँग्रेसने अॅड. के.सी. पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली. पाडवी यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक रंगतदार होणार अशी चर्चा असतानाच डॉ. सुहास नटावदकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामळे ही रंगत अधिक संघर्षपूर्ण होईल असे चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काग्रेस पक्षाची मजबूत अशी मतदार प्रचरारयंत्रणा तसेच, मतदारसंघातून मिळणारी सहानुभूती याचा फायदा पाडवी यांना होऊ शकतो. सर्व समाजघटकांसोब असलेले सलोख्याचे संबंध हीसुद्धा पाडवी यांची जमेची बाजू आहे. (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ

Nandurbar Lok Sabha Constituency | (File Image)

डॉ. सुहास नटावदकर हे भाजपचे बंडखोर म्हणून ओळखले जातात. डॉ. नटावदकर हे गेली अनेक वर्षे भाजपचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये त्यांनी जरी पक्षाविरोधात बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, त्यांना मानणारा एक गट आजही भाजपमध्ये आहे. भाजपमधील नाराज निष्ठावंतांचा पाठिंबा डॉ. नटावदकर यांना मिळू शकतो. तसेच, आदिवासी जनतेची सहानुभूती मिळण्याही शक्यताही असल्याने डॉ. नटावदकर यांची उमेदवारी भाजपच्या मतविभागणीसाठी कारण ठरु शकते.