Responsibilities | representative pic- (photo credit -pixabay)

Duties Of Municipal Corporation: महानगरपालिका ही एक दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहरी भागांसाठी स्थापन केली जाणारी एक स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक संथा किंवा महामंडळ आहे. जी प्रामुख्याने महानगराचे व्यवस्तापन करते. प्रत्येक महानगरासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात वेगवेगळी महानगरपालिका असते. त्याचे नगरपरिषद, महानगरपालिका असे वेगवेगळे टप्पेही असतात. विशिष्ट शहराच्या लोकसंख्येनुसार, महानगरपालिका क्षेत्राची विभागणी प्रभागांमध्ये केली जाते. प्रभागात राहणारे लोक प्रतिनिधी निवडतात. हा प्रतिनिधी दर पाच वर्षांनी नगरसेवक म्हणून निवडला जातो. स्वच्छता, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य यामध्ये महापालिका महत्त्वाची भूमिका बजावते. जाणून घ्या महापालिकेची कामे (Responsibilities of Municipal Corporation) कोणती?

महामंडळाची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. महापालिकेत विविध विभाग आणि जबाबदाऱ्या निश्चित करुन दिलेल्या असतात. त्यासाठी पालिका आयुक्त प्रशासकीय अधिकारी सरकारद्वारे दिले जातात. तर लोकसंख्येच्या तुलनेत काही लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. त्यांना नगरसेवक म्हणतात. हे नगरसेवक महापौर निवडून देतात. महापौर आणि पालिका आयुक्त एकमेकांशी संवाध साधून शहराबाबत निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. निर्मय घेणयाचे काम महापौर नगरेसवकांच्या बहुमताने घेतात. तर पालिका आयुक्त लोकप्रतिनिधींनी घेतलेले निर्णय कायदा आणि नियमांच्या आधारे राबवण्याचे काम करतात. महापौर हे महापालिकेचे अध्यक्ष असतात. इनेक ठिकाणी कार्यकारी आणि प्रशासकीय अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. पालिका आयुक्त आयएएस अधिकाऱ्यांना दिले जाते. त्यामुळे महापौर हे केवळ औपचारिक प्रमुख ठरतात. महानगरपालिका ही एक स्वावलंबी संस्था आहे ज्याला मुख्यतः मालमत्ता कर आणि राज्य सरकारच्या मदतीतून निधी मिळतो. महापालिकेची कामे काय सविस्तर जाणून घेण्यासाठी या पीडिएफवर क्लिक करा.

पालिकेमध्ये विभाग पाणी पुरवठा आणि सांडपाणी विल्हेवाट, शिक्षण मंडळ, गृहनिर्माण विभाग, सार्वजनिक सुरक्षा आणि आरोग्य सेवा इत्यादी विविध आवश्यक सामुदायिक सेवांसाठी विभाग असतात.