कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबई (Mumbai) येथील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाचे (Western Railway administration) कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे गेल्या 6 दिवसांत पश्चिम रेल्वेचे तब्बल 135 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्याऱ्यांचे आभार मानण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांठी संचारबंदी लागू करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला होता. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळून संचारबंदीत कोणताही नागरिक घराबाहेर पडू शकत नाही. तसेच प्रवास करु शकत नाही. याशिवाय संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई कठोर कारवाई केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या प्रवासी वाहतकीतून मिळणारे आणि इतर माध्यमातून मिळणारा महसूलसुद्धा बुडत आहे. पश्चिम रेल्वेचा 22 मार्चपासून आतापर्यंत एकूण 135 कोटी 66 लाख रुपयांचे नुकसान झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे मंत्रालयाने मुंबईची उपनगरीय लोकल, देशातील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, कोलकोता मेट्रो 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 24 मार्च रोजी नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे 21 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी, 14 एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहणार आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेचे याचा अर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती लोकमतने दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावली तातडीची बैठक
भारतीय रेल्वेला जाहिरातीतून आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाला उत्पन्न मिळत होते. भारतात 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे येत्या काही दिवस रेल्वे प्रशासनाला नुकसानाच्या सामोरे जावा लागणार आहे. माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 724 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 45 रुग्णांची कोरोनाच्या जाळ्यातून सुटका झाली आहे. तसेच 661 रुग्णांवर देशभरातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.