मुंबई (Mumbai ) शहरात पावसाने ( Mumbai Rains) पुनरागमन केल्यामुळे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात प्रामुख्याने डेंग्यू (Dengue) आणि लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis ) यांसारख्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणाव वाढळे आहेत. पाठिमागील साधारण 11 दिवसांमध्ये प्रतिदिन डेंग्युच्या किमान 7 रुणांची नोंद झाली आहे आणि त्याच्याच जवळपास लेप्टोस्पायरोसिस रुग्णांची सुद्धा. मुंबई महापालिका (BMC) हद्दीत सप्टेंबरच्या पहिल्या 11 दिवसांत शहरात डेंग्यूचे 80 रुग्ण आढळले. बीएमसीच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून आठवडाभरात लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये तीन वेळा वाढ झाली आहे. गेल्या 11 दिवसांत अठरा प्रकरणे समोर आली आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी माहिती देताना प्रसारमाध्यमांना सांगितले की, पावसाचे मुंबईत पुनरागमन झाले आहे. त्यात पाऊस सलग नाही. अधूनमधून पडतो. त्यामुळे डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नागरिकांनी उगाचच स्वत:च्या मनाने जाऊन औषधे घेणे टाळावे. वेगळी लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (हेही वाचा, Epidemic in Mumbai: मुंबई शहरात साथीचे आजार बळावले, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, कावीळ, स्वाइन फ्लू रुग्णांमध्ये पुन्हा वाढ)
लेप्टोस्पायरोसिसहा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो उंदीर, कुत्रे, मांजर, म्हैस इत्यादींच्या संक्रमित मूत्राद्वारे पसरतो. मानवाचा मूत्राशी थेट संपर्क आल्याने किंवा या प्राण्यांच्या मूत्राने दूषित पाणी, माती किंवा अन्नाद्वारे लेप्टोस्पायरोसिस पसरु शकतो. होऊ शकतो. ओरखडे, मोकळ्या जखमा आणि इतर माध्यमातून जीवाणू तुमच्या त्वचेद्वारे तुमच्या शरीरा प्रवेश करू शकतात. हे जीवाणू तुमच्या नाकातून, तोंडातून आणि गुप्तांगातूनही शरीरात प्रवेश करू शकतात असेही डॉ. गोमरे सांगतात.