Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भारत विरूद्ध न्यूझिलंड (IND Vs NZ) असा महत्त्वाचा सेमी फायनलचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium)  वर रंगणार आहे. पण आजच्या या सामन्यापूर्वी मुंबई पोलिसांना (Mumbai Police)  धमकी आली आहे. X वर मेसेजच्या माध्यमातून ही धमकी आली आहे. आज वानखेडेवर काही 'अप्रिय' घटना मॅच दरम्यान घडू शकतात असं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना धमकीचा मेसेज करण्यात आला आहे. ज्यामध्ये या अप्रिय घटनेचा उल्लेख आहे. भारत विरूद्ध न्यूझिलंड सामना आज वानखेडे वर असून स्टेडियम प्रमाणेच आजूबाजुच्या भागातही सुरक्षा काटेकोर पाळली जाईल असं सांगण्यात आलं आहे. 700 पोलिसांचा ताफा सध्या लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

धमकी देणार्‍या व्यक्तीने मुंबई पोलिसांना एका पोस्ट मध्ये टॅग केले होते. ज्यामध्ये गन, ग्रेनेड्स, बुलेट्स चा फोटो आहे. Mumbai Police: भारत न्यूझीलंड वर्ल्डकप सामन्यापूर्वी प्रेक्षकांसाठी मुंबई पोलिसांकडून सुचना, पाहा व्हिडिओ .

पहा ट्वीट

मुंबई पोलिस अलर्ट वर

17 वर्षीय ताब्यात

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रांचने 17 वर्षीय तरूण ताब्यात घेतला आहे. तो लातूरचा असून त्याने हा प्रकार का केला? याचा तपास सुरू आहे.

मुंबई पोलिसांना यापूर्वीही मुंबईत काही ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्याबाबत धमकीचे फोन कॉल आले होते मात्र सुदैवाने त्यापैकी कोणत्याही कॉल मध्ये सत्यता नव्हती. पोलिसांच्या नियमावलीनुसार सामना पाहण्यासाठी जाताना तंबाखूजन्य पदार्थ,  ज्वलनशील पदार्थ, पेन, बॅनरर्स, आक्षेपार्ह वस्तू नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजल्यापासून प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आजचा सामना पाहण्यासाठी अनेक VVIP लोकं, सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत.