Mumbai Building Collapse Updates: मुंबईतील डोंगरी (Dongri) परिसरात असलेल्या केसरभाई इमारत दुर्घटना प्रकरणात जबाबदारी कोणाची? या प्रश्नावर म्हाडाने स्पष्टीकरण दिले आहे. ही इमारत आणि त्या इमारतीचा कोसळलेला भाग याच्याशी आमचा म्हाडाचा काहीही संबंध नाही. कोसळलेली इमारत ही पूर्णपणे अनधिकृत होती. हा भाग म्हाडाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असेही म्हाडाने म्हटले आहे. म्हाडाचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले (Mumbai Mhada PRO Vaishali Gadpale) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान, ही इमारत म्हाडाचे असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे या इमारतीवरुन म्हाडा (Mhada) आणि मुंबई (Mumbai) महापालिकेत तूतूमैंमैं सुरु आहे.
वैशाली गडपाले यांच्या प्रसिद्धी पत्रकातील प्रमुख मुद्दे
- म्हाडाचा घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील डोंगरी येथील २५/C केसरभाई ही उपकरप्राप्त इमारत कोसळलेली नाही. ही इमारत सध्याही उभीच आहे.
- वास्तव्यास धोकादायक असल्याने सन २०१८ साली मंडळाने या इमारतीतील रहिवाशांना व्हेकेशन नोटीस देऊन ती रिकामी करवून घेतली. आजही ही इमारत त्या जागी उभी आहे.
- आज (16 जुलै 2019) घडलेल्या दुर्घटनेमध्ये २५/C केसरभाई इमारतीच्या मागील अनधिकृत बांधकामाचा भाग कोसळला आहे.
- हे अनधिकृत बांधकाम उपकरप्राप्त नसल्याने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कार्यक्षेत्रात मोडत नाही. त्यामुळे या पडलेल्या बांधकामाला म्हाडा जबाबदार नाही.
एएनआय ट्विट
#WATCH Mumbai: A woman being rescued by NDRF personnel from the debris of the building that collapsed in Dongri, today. 2 people have died & 7 people have been injured in the incident. #Maharashtra pic.twitter.com/tmzV3Dmm7C
— ANI (@ANI) July 16, 2019
दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, डोंगरीतील केसरभाई इमारतीचा काही भाग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत पाच जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्यापही घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सुमारे 40 जण अडकल्याची भीती सकाळपासून व्यक्त केली जात आहे.