Mumbai Local trains. Image Used For Representational Purpose Only.(Photo Credits: ANI)

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. अशातच मुंबईची लाईफलाइन असणाऱ्या लोकल बद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. याच संदर्भात महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चलह यांनी सुद्धा शहरात कोरोनाचा वेग वाढत असल्याचे म्हटले आहे. खरंतर मुंबई लोकलच्या माध्यमातून जवळजवळ दिवसाला 50 लाख लोक प्रवास करतात. गेल्या वर्षात मार्च महिन्यापासूनच कोरोना व्हायरसने शहरात एन्ट्री केल्यानंतर लोकल नागरिकांच्या सेवेसाठी बंद करण्यात आली. त्यानंतर आता 1 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा ती सर्वसामान्यांसाठी सुद्धा सुरु केली. त्यानंतर सध्या मुंबईत अचानक कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

इकबाल चहल यांनी असे म्हटले आहे की, जर लोकलमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असेल तर ते समजून घेण्यासाठी तीन आठवडे लागतील. आता आम्ही 1 फेब्रुवारी पासून तीन आठवडे दूर आहोत. तर लोकलमुळे वाढलेल्या कोरोनाची रुग्णसंख्या ही काही प्रमाणात असू शकते.(Maharashtra Police: कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल; 'वर्क फ्रॉम होम'चाही पर्याय)

आधीपासूनच लोकल ट्रेन सुरु केल्यानंतर रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळेच मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून प्रवासादरम्यान नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. या व्यतिरिक्त लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टंन्सिंग पाळणे कठीण होत आहे.

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी म्हटले की, लोकल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगली जात आहे. पश्चिम रेल्वेकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. त्यांनी म्हटले की, आम्ही ट्रेनचे रेक सातत्याने निर्जंतुकीकरण करत आहोत. यासाठी एक विशिष्ठ टीम सुद्धा तयार करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आम्ही 300 हून अधिक बुकिंग काउंटर सुरु केले आहेत. सध्या 1300 लोकल सेवा सुरु असून राज्य सरकार कडून देण्यात आलेल्या सुचनांचे पूर्णपणे पालन करत आहोत.(Night Curfew in Aurangabad: औरंगाबाद शहरात आज रात्रीपासून संचारबंदी; 14 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असेल नाईट कर्फ्यू)

महापालिकेच्या आकडेवारीनुसार असे कळते की, लोकल सेवा नागरिकांसाठी सुरु केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अशातच लोकलमुळेच रुग्ण वाढल्यासारखे होते. 1 फेब्रुवारी पर्यंत मुंबईत दिवसाला 400 पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. पण पहिल्या आठवड्याच्या शेवटापर्यंत हा आकडा 500 वर पोहचला. त्यानंतर पु्न्हा 13 फेब्रुवारीला 599 होती ती 20 फेब्रुवारी पर्यंत 897 वर पोहचली. ही आकडेवारी मुंबईत डिसेंबर महिन्याच्या तुलनेत अधिक आहे. त्यानंतर आता महापालिकेने कठोर पाऊल उचलले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून सुद्धा या गोष्टींवर बारकाईने लक्ष दिले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, जर मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढला तर उद्धव ठाकरे यांचे सरकार पुढील आठ दिवसात योग्य तो निर्णय घेणार आहे. अद्याप लोकल सेवा बंद करण्याबद्दल राज्य सरकार किंवा रेल्वे कडून कोणताच प्रस्ताव आलेला नाही. पण रेल्वेकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्य सरकार सर्व नियमांचे पालन करण्यास तयार आहे. आता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर जवळजवळ 95 टक्के लोकल सेवा सुरु आहे. ज्याच्या माध्यमातून 22 लाख नागरिक प्रतिदिन प्रवास करतात.